Join us

State Bank च्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट; १५० मिनिटांपर्यंत ठप्प राहणार 'या' सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 4:30 PM

State Bank Of India : भारतीय स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ६ आणि ७ ऑगस्ट रोजी काही सेवा राहणार बंद.

ठळक मुद्देभारतीय स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे.६ आणि ७ ऑगस्ट रोजी काही सेवा राहणार बंद.

State Bank Of India : भारतीय स्टेट बँकेनं (State Bank Of India) आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. ६ आणि ७ ऑगस्ट रोजी आपल्या काही डिजिटल सेवा बंद राहणार असल्याची माहिती बँकेनं दिली आहे.

स्टेट बँकेनं दिलेल्या माहितीनुसार मेन्टेनन्सच्या कारणास्तव डिजिटल सेवा काही तासांसाठी बंद राहणार आहे. SBI YONO, योनो लाईट, इंटरनेट बँकिंग आणि योनो बिझनेससह डिजिटल बँकिंग सेवा ६ ऑगस्ट रोडी रात्री २२.४५ वाजल्यापासून ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १.१५ वाजेपर्यंत तब्बल १५० मिनिटांपर्यंत बंद राहतील. यादरम्यान, कोणत्या अन्य अॅक्टिव्हीटी अथवा ट्रान्झॅक्शन केल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.  गेल्या काही महिन्यांपासून स्टेट बँकेच्या ग्राहकांना अनेकदा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जुलै महिन्यात दोन वेळा स्टेट बँकेनं मेन्टेनन्सच्या कारणास्तव काही सेवा बंद ठेवल्या होत्या. दरम्यान, हे काम रात्रीच्या वेळेस केलं जात असल्यानं अधिक लोकांना समस्यांना सामोरं जावं लागत नाही. स्टेट बँकेचे इंटनेट बँकिंगच्या ऐवजी युपीआय आमि योनो ग्राहकांची एकूण संख्या २५ कोटींपेक्षा अधिक आहे.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाइंटरनेटपैसाबँकव्यवसाय