सध्या कॉन्टॅक्टलेस पेमेंटमुळे क्यूआर कोडचा (QR Code) वापर झपाट्याने वाढला आहे. क्यूआर कोडच्या वाढत्या वापरामुळे, त्याच्याशी संबंधित धोके देखील वाढू लागले आहेत. क्यूआर कोडमुळे ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. दरम्यान, काही लोक याचा वापर करून लोकांची फसवणूकही करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank of India) आपल्या ग्राहकांना सतर्क केलं आहे. पैसे प्राप्त करण्यासाठी QR Code चा वापर कधीही केला जात नाही. यासाठी पैसे प्राप्त करताना क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितलं जात नाही. अशा गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे. जर तुम्ही QR कोडद्वारे पेमेंट करत असाल तर याबाबत काही महत्त्वाची बाबी जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.
एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे की, क्यूआर कोड कधीही पैसे घेण्यासाठी वापरले जात नाहीत. दरम्यान, QR कोड हॅक करता येत नाही. असं असलं तरी काही लोक फसवणूकीसाठी क्यूआर कोड रिप्लेस करत असतात. तसंच कोणत्याही प्रकारे आमिष दाखवून तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी प्रवृत्त करू शकतात.
You don’t receive money when you scan a QR code. All you get is a message that your bank account is debited for an ‘X’ amount. Do not scan #QRCodes shared by anyone unless the objective is to pay. Stay alert. #StaySafe. https://t.co/EXGQB7YFT9#QRCodes#InternetBanking
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 27, 2021
क्यूआर कोड स्कॅन करत असला तरीही, जोपर्यंत तुम्हाला पैसे पाठवायचे नाहीत तोपर्यंत तुमचा यूपीआय पिन टाकू नका. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा UPI पिन टाकण्याची गरज नाही. म्हणूनच तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही फक्त QR कोडचा वापर पैसे पाठवण्यासाठी केला पाहिजे आणि पैसे मिळवण्यासाठी नाही. जेव्हाही तुम्हाला विशिष्ट रक्कम पाठवण्यास सांगितलं जातं, तेव्हा Google Pay, BHIM, SBI Yono इत्यादी UPI अॅप्स वापरून QR कोड स्कॅन करा आणि नंतर व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी रक्कम आणि तुमचा UPI पिन टाका.