Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील

अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील

मुकेश अंबानींच्या रिलायन्सने अमेरिकेत मोठा व्यवहार केला आहे. २०२४ मध्येच या कंपनीने व्यवसाय सुरु केला आहे. एवढ्या नव्या कंपनीत अंबानींनी पैसा ओतला याचा कारणही त्या क्षेत्राचे भविष्यच असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 08:25 PM2024-11-28T20:25:20+5:302024-11-28T22:00:48+5:30

मुकेश अंबानींच्या रिलायन्सने अमेरिकेत मोठा व्यवहार केला आहे. २०२४ मध्येच या कंपनीने व्यवसाय सुरु केला आहे. एवढ्या नव्या कंपनीत अंबानींनी पैसा ओतला याचा कारणही त्या क्षेत्राचे भविष्यच असणार आहे.

All Americans invest money in India, Mukesh Ambani Reliance poured money in America itself... big deal with helium WHI | अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील

अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील

रिलायन्सच्या शेअरसाठी खरेदी कराचे रेटिंग आलेले असताना त्याला बुस्ट देणारी आणखी एक मोठी डील मुकेश अंबानींनी केली आहे. अंबानींच्या रिलायन्सने अमेरिकेत मोठा व्यवहार केला आहे. रिलायन्सची सहकारी कंपनी आरएफआययुएलने वेव्हटेक हिलिअममध्ये तब्बल १.२ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. एकीकडे सगळे अमेरिकन भारतात पैसा ओतत असताना मुकेश अंबानींनी थेट अमेरिकेतच पैसा ओतल्याने रिलायन्सच्या शेअरना मोठी हवा मिळणार आहे. 

WHI मध्ये अंबानींनी २१ टक्के हिस्सा मिळविला आहे. २७ नोव्हेंबरला रिलायन्सने ही डील केली आहे, शेअर खरेदी करत अंबानींनी एवढा पैसा त्या कंपनीला दिला आहे. कमी कार्बन उत्सर्जनाच्या योजनेचा हा भाग आहे. हेलिअमची वाढती मागणी पाहता रिलायन्सने या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायंस फाइनेंस एंड इन्वेस्टमेंट्स यूएसए एलएलसी असे या अंबानींच्या कंपनीचे नाव आहे. 

तर डब्लूएचआय ही अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीची स्थापना २ जुलै २०२१ मध्ये झाली होती. ही कंपनी हेलिअमचा शोध घेणे आणि त्याचे उत्पादन करण्यात तज्ञ आहे. २०२४ मध्येच या कंपनीने व्यवसाय सुरु केला आहे. एवढ्या नव्या कंपनीत अंबानींनी पैसा ओतला याचा कारणही त्या क्षेत्राचे भविष्यच असणार आहे.

हेलियम हे औषध, वैज्ञानिक संशोधन, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उत्पादन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा सेंटर्सच्या वाढत्या प्रस्थामुळे या हेलियमची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. 

Web Title: All Americans invest money in India, Mukesh Ambani Reliance poured money in America itself... big deal with helium WHI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.