Lokmat Money > बिझनेस न्यूज > UPI पेमेंटचा वापर करता? मग लक्ष द्या... 31 डिसेंबरपर्यंत निष्क्रिय UPI आयडी बंद होणार

UPI पेमेंटचा वापर करता? मग लक्ष द्या... 31 डिसेंबरपर्यंत निष्क्रिय UPI आयडी बंद होणार

UPI आयडीबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 12:51 PM2023-11-18T12:51:25+5:302023-11-20T17:24:21+5:30

UPI आयडीबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

all banks and third party app will verify inactive upi id still 31st december | UPI पेमेंटचा वापर करता? मग लक्ष द्या... 31 डिसेंबरपर्यंत निष्क्रिय UPI आयडी बंद होणार

UPI पेमेंटचा वापर करता? मग लक्ष द्या... 31 डिसेंबरपर्यंत निष्क्रिय UPI आयडी बंद होणार

तुमच्या UPI आयडीबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्व बँका, PhonePe आणि Google Pay सारखे थर्ड पार्टी एप्स निष्क्रिय असलेले UPI आयडी बंद करणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सर्व बँका आणि थर्ड पार्टी एप्सना एका वर्षापासून कोणतेही व्यवहार न केलेल्या आयडींचे क्रेडिट इनव्हर्ट डिसेबल करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या हा निर्णय थर्ड पार्टी अॅप्ससाठीच आहे. परंतु यानंतर आवश्यक असल्यास ग्राहकांना त्यांचे युपीआय आयडी पुन्हा रजिस्टर करून सक्रिय करता येतील. 

एनपीसीआयने यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत, या तारखेपूर्वी तुमचा UPI आयडी सक्रिय करा. UPI आयडी निष्क्रिय करण्यापूर्वी बँक युजर्सना ईमेल किंवा मेसेजद्वारे सूचना देखील पाठवेल. NPCI च्या या पाऊलामुळे UPI व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील. याशिवाय चुकीचे व्यवहारही थांबतील.

NPCI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व थर्ड पार्टी एप्स आणि PSP बँका निष्क्रिय ग्राहकांचा UPI आयडी आणि त्याच्याशी संबंधित मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन करतील. एका वर्षापासून या आयडीवरून कोणत्याही प्रकारचे क्रेडिट किंवा डेबिट केले नसल्यास ते बंद केले जाईल. नवीन वर्षापासून ग्राहकांना या आयडीवरून व्यवहार करता येणार नाहीत.

चुकीचे व्यवहार होणार नाहीत

NPCI ने अशा UPI आयडी ओळखण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी एप्सना 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांद्वारे, NPCI हे सुनिश्चित करू इच्छित आहे की, पैसे चुकीच्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाणार नाहीत किंवा त्याचा गैरवापर होणार नाही. अलीकडच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

मोबाईल नंबर बदलल्यामुळे येतात अडचणी 

अनेक वेळा लोक आपला मोबाईल नंबर बदलतात आणि त्याच्याशी संबंधित UPI आयडी निष्क्रिय करायला विसरतात. अनेक दिवस तो नंबर बंद असल्याने तो दुसऱ्या कोणाला तरी मिळतो. परंतु, या क्रमांकाशी फक्त जुना UPI आयडी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत चुकीचे व्यवहार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

Web Title: all banks and third party app will verify inactive upi id still 31st december

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.