Join us

आॅक्टोेबरमध्ये वैतागले सर्वच कर सल्लागार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 2:43 AM

कृष्णा, आॅक्टोबर महिना उद्या संपेल. या वेळी संपूर्ण आॅक्टोबर महिन्यात देय तारखांचा भडिमार झाला, तर तू याबद्दल काय सांगशील ?

सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आॅक्टोबर महिना उद्या संपेल. या वेळी संपूर्ण आॅक्टोबर महिन्यात देय तारखांचा भडिमार झाला, तर तू याबद्दल काय सांगशील ?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, आॅक्टोबर महिना म्हणजे टॅक्स हिट. या वर्षी टॅक्स आॅडिटची देय तारीख वाढून ती ३१ आॅक्टोबर झाली होती. जीएसटीच्याही खूप देय तारखा आॅक्टोबरमध्ये होत्या. त्यामुळे सर्वच करदात्यांची आणि कर सल्लागारांची धावपळ झाली. त्यातच दिवाळीही आली. त्यामुळे या देय तारखांना सर्वच जण वैतागले आहेत.अर्जुन : कृष्णा, आॅक्टोबर महिन्यात कोणकोणत्या देय तारखांचा भडिमार झाला?कृष्ण : अर्जुना, ७ आॅक्टोबर ही टीडीएस/टीसीएसच्या चलनची तारीख होती. आरओसीकडे फॉर्म एडीटी-१ दाखल करण्याची तारीख ७ आॅक्टोबर होती. टीसीएस रिटर्न आणि ईएसआय व पीएफची देय तारीख १५ आॅक्टोबर होती. जुलै महिन्याचा जीएसटीआर-१ची १० आॅक्टोबर ही देय तारीख होती. कंपोझिशन डिलरचे रिटर्न भरण्याची तारीख १८ आॅक्टोबर होती, परंतु ती वाढवून १५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याचा जीएसटीआर-३बीची २० आॅक्टोबर ही देय तारीख होती. आयकर रिटर्न अपलोड करण्याची देय तारीख ३१ आॅक्टोबर आहे. त्याचप्रमाणे जुलै महिन्याचा जीएसटीआर-२ची देय तारीख आणि टीडीएस रिटर्नची तारीखदेखील ३१ आॅक्टोबरच आहेअर्जुन : कृष्णा, ३१ आॅक्टोबरला टॅक्स आॅडिटची देय तारीख आहे, तर तेव्हा काय करायला हवे?कृष्ण : अर्जुना, टॅक्स आॅडिटची देय तारीख म्हणजे, त्या दिवसांपर्यंत सर्व करदाते ज्यांना टॅक्स आॅडिटची तरतूद लागू आहे, त्यांनी त्यांचा टॅक्स आॅडिट रिपोर्ट (टिएआर) अपलोड करावा. सनदी लेखापालांकडून करदात्यांनी आॅडिट करून घ्यावे. या वर्षी टॅक्स आॅडिटची देय तारीख ३० सप्टेंबरवरून वाढून ३१ आॅक्टोबर झाली होती. त्यामुळे टीएआर अपलोड करण्यासाठी थोडा वेळ मिळाला होता, परंतु मध्येच दिवाळी आली. सर्व करसल्लागारांवर प्रचंड ताण आहे. परंतु देय तारखेपर्यंत सर्व रात्रभर बसून टॅक्स आॅडिट पूर्ण करत आहेत.अर्जुन : कृष्णा, ३१ आॅक्टोबर ही टीडीएसची देय तारीख आहे का?कृष्ण : होय अर्जुना, ३१ आॅक्टोबर ही आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या क्वार्टर-२ चे टीडीएस रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, परंतु करदात्यांनी शेवटची तारीख लक्षात न ठेवता, लवकरात लवकर आवश्यक माहिती देऊन रिटर्न दाखल करावे. जर ई-टीडीएस निवेदन वेळेवर दाखल केले नाही, तर टीडीएस कापणाºया व्यक्तीला पॅनल्टी भरावी लागेल. या सर्वच गुंतागुंतीच्या देय तारखांमुळे असे वाटते की, सर्वच करसल्लागारांच्या आयुष्यातील सर्वात अवघड महिना हा आॅक्टोबर, २०१७ असेल.अर्जुन : कृष्णा, ३१ आॅक्टोबरला जीएसटीची कोणती देय तारीख आहे का?कृष्ण : अर्जुना, ३१ आॅक्टोबर ही जीएसटीमध्ये जुलै महिन्याचा फॉर्म जीएसटीआर-२ए दाखल करण्याची देय तारीख आहे. जीएसटीच्या करदात्यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत जुलै महिन्यातील खरेदीच्या तपशीलाची जी स्वयंनिर्मित आहे, त्याची स्वीकृती द्यावी. टॅक्स आॅडिट आणि फॉर्म जीएसटीआर-२एची एकच देय तारीख असल्यामुळे करदात्यांची धावपळ तर होणारच आहे.अर्जुन : कृष्णा, करसल्लागारांना आॅक्टोबर महिन्यात कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे?कृष्ण : अर्जुना, टॅक्स आॅडिट रिपोर्टमध्ये सखोल माहिती द्यावी लागते व विविध प्रकारचे रिपोटर््स बनवावे लागतात. फॉर्म जीएसटीआर-२एमध्ये प्रत्येक व्यवहार तपासावा लागतो आणि ही सर्व प्रक्रिया आॅनलाइन आहे. त्यामुळे ऐन वेळी इंटरनेट कनेक्टिव्हिटी, अपलोडिंग एरर इ. समस्यांना सामोरे जावे लागले. त्याचबरोबर, रिटर्न्समध्येदेखील काही त्रुटी असल्यामुळे ते दाखल करतानाही अडचणी येत आहे. कर विभागही सरते शेवटी डेट वाढवतो. त्याचा फायदाच होत नाही. कारण गाडी गेल्यावर टिकीट काढण्याचा काय फायदा?अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, सनदी लेखापालांसह सर्व करसल्लागारांना तणाव सोसावा लागला, परंतु करदात्यांच्या सहकार्याने तो काही प्रमाणात कमी झाला. शासनाने चांगली संगणक प्रणाली आणायला हवी आणि सर्वच गोष्टी आॅनलाइन करण्यात आल्या. त्यामुळे करदात्यांना अशाच तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागेल. अपलोड आणि डाउनलोडच्या भानगडीमुळे सर्वांचाच वाढला लोड.

टॅग्स :कर