Join us

'ऑल थिंग्‍ज ईव्‍ही’… HDFC अर्गोनं लाँच केली पहिली इलेक्ट्रीक व्हेईकल इकोसिस्टिम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 5:03 PM

विद्यमान आणि भविष्यात इलेक्ट्रीक वाहनांची खरेदी करणाऱ्यांसाठी माहिती देण्यापासून चार्जिंग स्टेशन्स शोधण्यापर्यंत मिळणार माहिती.

खासगी क्षेत्रातील अग्रगण्य जनरल इन्शुरन्स कंपनी एचडीएफसी अर्गोनं (HDFC ERGO) इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) पोर्टल सुरू केले आहे. ‘ऑल थिंग्ज ईव्ही’ हे देशातील पहिले वन-स्टॉप-सोल्यूशन पोर्टल आहे. या पोर्टलचा वापर विद्यमान आणि इलेक्ट्रीक वाहन विकत घेणाऱ्यांना करता येईल. इलेक्ट्रीक मोबिलिटीसाठी भारत सरकारच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने हा उपक्रम विद्यमान आणि इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्याचा विचार असलेल्यांच्या गरजांची पूर्ताता करत असल्याची प्रतिक्रिया कंपनीकडून देण्यात आली.

उपक्रमाचा एक भाग म्हणून एचडीएफसी अर्गोने विद्यमान आणि संभाव्य EV इकोसिस्टम वापरकर्त्यांसाठी एक समर्पित प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. ज्यांनी इलेक्ट्रीक वाहन खरेदी केलं आहे किंवा ज्यांची ते खरेदी करण्याची योजना आहे किंवा तेजीनं वाढत असलेल्या या ईव्ही स्पेसमधून ज्यांची कमाईची योजना आहे अशा लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी www.allthingsev.io एन्ड टू एन्ड माहिती प्रदान करतो. याद्वारे विद्यमान ग्राहकांना जवळपासच्या चार्जिंग स्टेशन्सची माहिती, इंटरसिटी प्रवासासाठी मार्गावरील चार्जिंग स्टेशन्सचे स्थान आणि त्यांच्या ईव्हीच्या देखभालीबद्दल माहिती मिळते. या शिवाय या पोर्टलच्या माध्यमातून सरकारद्वारे देण्यात येणारे लाभ आणि सर्व इलेक्ट्रीक वाहनांच्या पर्यायांची माहितीही मिळू शकते.

याशिवाय इलेक्ट्रीक वाहनांना आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन उभारू पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चार्जिंग युनिटचे उपलब्ध पर्याय आणि त्यासाठी आवश्यक असलेला निधी, त्यातून मिळणारा नफा याची देखील माहिती मिळू शकते. www.allthingsev.io या प्लॅटफॉर्मवर चार्जिंग स्टेशनवर स्लॉट बुकिंग, रोड साईड असिस्टंट, RTO सेवा यासारख्या सुविधांसह एक रोडमॅप आहे. “एका विमा कंपनीच्या रूपात जे हवामान बदलांच्या निरनिराळ्या प्रोटोकॉल अंतर्गत स्थिरतेच्या लक्ष्यांची पूर्तता करण्यास कटिबद्ध आहे. सर्वांकरिता हरित व स्थिर भविष्‍याच्‍या खात्रीसाठी भारताच्‍या महत्त्वाकांक्षी ईव्‍ही आराखड्याला पाठिंबा देण्‍यामधील आमची जबाबदारी माहित आहे.” अशी प्रतिक्रिया ऑल थिंग्ज ईव्हीच्या लाँच प्रसंगी बोलताना एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष (रिटेल बिझनेस) पार्थनील घोष यांनी दिली.

 

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरभारत