Join us  

गुपचूप आपलेच शेअर खरेदीचा आरोप; अदानी समूहानं दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, "हे दावे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 1:17 PM

अदानी समूहाने गुपचुप स्वतःचेच शेअर खरेदी करून स्टॉक एक्सचेन्जमध्ये लाखों डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा दावा एका माध्यम समूहाने केला आहे.

अदानी समूहाने गुपचुप स्वतःचेच शेअर खरेदी करून स्टॉक एक्सचेन्जमध्ये लाखों डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा दावा एका माध्यम समूहाने केला आहे. ऑर्गेनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टचा (OCCRP) हा अहवाल गार्डियन आणि फायनान्शिअल टाईम्ससोबत शेअर करण्यात आला आहे. यात अदानी समूहाने मॉरीशसमध्ये केलेल्या ट्रांझॅक्शंसचे डीटेल्सचा पहिल्यांदाच खुलासा केल्याचा दावाही करण्यात आला आहे. दरम्यान, अदानी समूहानं या आरोपांचं खंडन करत यावर स्पष्टीकरण दिलंय.

दरम्यान, अदानी समूहाने एक निवेदन जारी करून हे आरोप फेटाळले आहेत. हे सोरोसला पाठिंबा देणाऱ्या संघटनांचं कृत्य असल्याचं दिसत आगे. हिंडनबर्ग अहवाल पुनरुज्जीवित करण्यासाठी परदेशी प्रसारमाध्यमांचा एक भाग देखील याला वाव देत आहे. हे दावे एका दशकापूर्वी बंद झालेल्या प्रकरणांवर आधारित आहेत.

त्यानंतर डीआरआयनं ओव्हर इनव्हॉइसिंग, परदेशात निधी हस्तांतरित करणं, रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्स आणि एफपीआयद्वारे गुंतवणूक या आरोपांची चौकशी केली. एका स्वतंत्र न्यायाधिकरणानं आणि अपीलीय न्यायाधिकरणानं यात कोणतंही ओव्हर व्हॅल्युएशन नव्हतं आणि व्यवहार कायद्यानुसार करण्यात आले होते याची पुष्टी केली होती. मार्च २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं आमच्या बाजूनं निर्णय दिला. त्यामुळे या आरोपांना कोणताही आधार नाही, असं अदानी समूहानं म्हटलंय. 

वाचा काय म्हटलेय समूहानं?

 

टॅग्स :अदानीगौतम अदानी