Lokmat Money > बिझनेस न्यूज > पावडरपासून Cancer होण्याचा आरोप, आता Johnson & Johnson 'या' व्यक्तीला देणार ₹१२६ कोटी; काय आहे प्रकरण?

पावडरपासून Cancer होण्याचा आरोप, आता Johnson & Johnson 'या' व्यक्तीला देणार ₹१२६ कोटी; काय आहे प्रकरण?

Johnson & Johnson News : जॉन्सन अँड जॉन्सन हे नाव सर्वांनाच माहित आहे. या कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 02:39 PM2024-10-16T14:39:35+5:302024-10-16T14:41:01+5:30

Johnson & Johnson News : जॉन्सन अँड जॉन्सन हे नाव सर्वांनाच माहित आहे. या कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे

Alleged Cancer caused by powder now Johnson & Johnson will pay rs 126 crore to person What is the matter | पावडरपासून Cancer होण्याचा आरोप, आता Johnson & Johnson 'या' व्यक्तीला देणार ₹१२६ कोटी; काय आहे प्रकरण?

पावडरपासून Cancer होण्याचा आरोप, आता Johnson & Johnson 'या' व्यक्तीला देणार ₹१२६ कोटी; काय आहे प्रकरण?

Johnson & Johnson News : जॉन्सन अँड जॉन्सन हे नाव सर्वांनाच माहित आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी बेबी केअरशी संबंधित उत्पादनं तयार करते आणि जवळजवळ प्रत्येक घरात लहान मुलांसाठी जॉन्सन अँड जॉन्सनची उत्पादनंही वापरली जातात. या कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीला एका व्यक्तीला १५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १२६ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असा आरोप करत या व्यक्तीनं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर २०२१ मध्ये खटला दाखल केला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कनेक्टिकट येथील इव्हान प्लॉटकिन या व्यक्तीने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरमुळे कॅन्सरचा धोका असल्याचा आरोप केला होता. जॉन्सनची पावडर बराच काळ वापरल्यानं त्याला मेसोथेलिओमासारखा दुर्मिळ कॅन्सर झाला, असा आरोप या व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीनं २०२१ मध्ये कंपनीवर आरोप केले होते. कनेक्टिकटच्या इव्हान प्लॉटकिन यांनी फेअरफिल्ड काउंटी, कनेक्टिकट सुपीरियर कोर्टात खटला दाखल केला, त्यानंतर कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. आता कंपनीला १२६ कोटी रुपयांची संपूर्ण नुकसान भरपाई देण्यास सांगण्यात आलं आहे.

कंपनीनं काय म्हटलं?

जॉन्सन अँड जॉन्सनकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली. कंपनी ट्रायल जजच्या चुकीच्या निर्णयाविरोधात अपील करेल, अशी प्रतिक्रिया वतीनं एरिक हास यांनी दिली. या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या तथ्यांवर सुनावणी करण्यापासून ज्युरीला रोखण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर सुरक्षित असून त्यात अॅस्बेस्टॉस (हानिकारक घटक) नसल्याचं वैज्ञानिक चाचण्यांनी यापूर्वीच सिद्ध केलंयह. अशा वेळी या पावडरमुळे कॅन्सर होऊ शकत असंही कंपनीनं म्हटलंय.

Web Title: Alleged Cancer caused by powder now Johnson & Johnson will pay rs 126 crore to person What is the matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.