Join us

Aadhaar शी संबंधित 'हा' खास नंबर नेहमी लक्षात ठेवा, सरकारी कामांमध्ये येणार नाही कुठलाच अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 4:50 PM

Aadhaar Card नसेल तर अनेक कामे अडकून पडतात. पण, आता आम्ही तुम्हाला एका नंबरविषयी सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमची कामे करू शकता.

आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. याचा सरकारी तसेच काही खाजगी कामांसाठी वापर होतो. आधार कार्डाशिवाय आपली अनेक कामे सुरुच होऊ शकत नाहीत. पण, कधीकधी महत्वाच्या कामावेळी तुम्हाला आधार कार्ड सापडत नाही किंवा तुमच्या हातून ते गहाळ होते. अशावेळी तुम्हाला नवीन आधार कार्ड बनवावे लागते. 

नवीन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला आधार केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागतात. पण, आधारसंबधी एक महत्वाचा नंबर आहे, जो तुम्हाला आधार कार्ड बनवताना मिळतो. या अतिशय महत्‍त्‍वाच्‍या क्रमांकाद्वारे तुम्हाला घरबसल्या आधार कार्ड डाउनलोड करता येईल. आम्ही ज्या क्रमांकाबद्दल बोलत आहोत तो तुमचा UID म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर किंवा EID म्हणजेच एनरोलमेंट आयडी नंबर आहे.

जेव्हा तुम्ही आधार कार्ड नोंदणी पूर्ण करता तेव्हा तुम्हाला हे दोन्ही क्रमांक मिळतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, आधार नोंदणी केल्यानंतर तुमचा UID क्रमांक आणि EID क्रमांक कुठेतरी नोंदवून ठेवा. या नंबरद्वारे तुम्ही तुमच्या आधार नोंदणीची स्थिती पाहू शकता. घरबसल्या आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तसेच, तुमचे कार्ड हरवले किंवा चुकले आणि तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आठवत नसेल, तर या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपली कामे करू शकता.  

टॅग्स :आधार कार्ड