Join us

जबरदस्त ब्रॉडबँड ऑफर : वर्षभरात वाचतील ७२०० रुपये, ५०० Mbps स्पीड; इन्स्टॉलेशन आणि राऊटरही फ्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 4:31 PM

कंपनी आपल्या ग्राहकांना चार वेगवेगळ्या किंमतींवर 500 एमबीपीएस प्लॅन ऑफर करते.

टाटा प्ले फायबर, टाटा प्लेची फायबर ब्रॉडबँड सेवा, आपल्या ग्राहकांना चार वेगवेगळ्या किंमतींवर 500 एमबीपीएस प्लॅन ऑफर करते. चार किंमतींमधील फरक केवळ वैधतेच्या कारणास्तव आहे. तुम्ही टाटा प्ले फायबरचा प्लॅन दीर्घ वैधतेसाठी विकत घेतल्यास तुम्हाला त्यावर सूटही मिळेल. परंतु सामान्य घरांतील वापरांसाठी 500 एमबीपीएस प्लॅन तसा आवश्यक नाही. हा हाय स्पीड डेटा प्लॅन फक्त लहान व्यवसाय आणि कार्यालयीन कामांसाठी खरेदी केला जाऊ शकतो. Tata Play Fiber च्या 500 Mbps प्लॅनबद्दल आपण तपशीलवार माहिती घेऊ.

टाटा प्ले फायबर 1 महिन्यासाठी 3600 रुपये, 3 महिन्यांसाठी 10800 रुपये, 6 महिन्यांसाठी 19800 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 36000 रुपयांचा 500 एमबीपीएस प्लॅन ऑफर करते. त्यामुळे जर तुम्ही 1 किंवा 3 महिन्यांचा प्लॅन घेतला तर तुम्हाला दरमहा 3600 रुपये द्यावे लागतील. पण जर तुम्ही 6 महिने आणि 12 महिन्यांच्या प्लॅनसाठी गेलात तर तुमचे अनुक्रमे 1800 आणि 7200 रुपये वाचतील. तथापि, कनेक्शनसाठी तुम्हाला एकाच वेळी 36,000 रुपये द्यावे लागतील.

मिळणार 3.3TB हायस्पीड डेटाTata Play Fibre च्या 500 Mbps प्लॅनसह, तुम्हाला 3.3TB हाय-स्पीड डेटा मिळेल. 3.3TB डेटा मर्यादेनंतर, तुमचा इंटरनेट स्पीड 3 Mbps पर्यंत कमी होईल. तुम्ही दीर्घकालीन वैधतेच्या प्लॅनसाठी गेलात तर तुम्हाला कोणतंही सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागणार नाही. जर तुम्ही मंथली प्लॅनसाठी गेलात, तर तुम्हाला 1000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागेल. टाटा प्ले फायबर आपल्या ग्राहकांना मोफत इन्स्टॉलेशन ऑफर करत आहे. याशिवाय कनेक्शन मिळण्यासोबत तुम्हाला मोफत ड्युअल-बँड राउटरही मिळेल.

टॅग्स :टाटाइंटरनेट