लंडन - गुगल आणि अॅपलसारख्या लोकप्रिय कंपन्यांना मागे टाकत अॅमेझॉन ही कंपनी नंबर वन ठरली आहे. अॅमेझॉन जगातील सर्वात जास्त व्हॅल्यूएबल ब्रँड झाला आहे. ब्रँड मूल्य राखणाऱ्या कंपनीच्या यादीत अॅमेझॉननंतर अॅपल आणि गुगलचा नंबर लागतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अॅमेझॉनच्या ब्रँड मूल्यात 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कॅन्टर या संस्थेने 100 कंपन्यांची एक यादी मंगळवारी (11 जून) प्रसिद्ध केली आहे. कॅन्टर ही संस्था जागतिक बाजारात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे मूल्यांकन करते. यानुसार अॅमेझॉनने अॅपल आणि गुगलला मागे टाकत बाजी मारली आहे. अॅमेझॉनच्या ब्रँड मूल्यात 52 टक्क्यांनी वाढ झाली असून ते 31550 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 21.90 लाख कोटी रुपये आहे. तर अॅपल दुसऱ्या स्थानी आहे. अॅपलचे ब्रँड मूल्य 30950 कोटी डॉलर म्हणजेच 21.49 लाख आहे. तिसऱ्या स्थानी गुगल असून त्याचे ब्रँड मूल्य 30900 कोटी डॉलर म्हणजेच 21.46 लाख कोटी रुपये आहे. 2006 पासून अशाप्रकारचे रँकींग केले जात आहे. यावर्षी अॅमेझॉन, अॅपल आणि गुगलनंतर मायक्रोसॉफ्टचा नंबर लागतो. मायक्रोसॉफ्ट चौथ्या स्थानी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 2018 मध्ये गुगल पहिल्या क्रमांकावर होतं.
नोकरी सोडा, पैसे घ्या, आमच्यासोबत बिझनेस करा; अॅमेझॉनची अमेझिंग ऑफर
सामान लवकरात लवकर ग्राहकांपर्यत पोहोचवण्यासाठी अॅमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना अनोखा प्रस्ताव दिला आहे. नोकरी सोडा आणि आमच्यासोबत व्यवसाय करा, असा प्रस्ताव अॅमेझॉनकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी कंपनीनं कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतदेखील देऊ केली आहे. अॅमेझॉनकडून प्राइम मेंबरशिप दिली जाते. या अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना वेगवान सेवा दिली जाते. सध्या अशा ग्राहकांपर्यंत दोन दिवसांमध्ये सामान पोहोचतं. मात्र हा कालावधी एका दिवसावर आणण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. त्यासाठी कंपनीनं नवी योजना आखली आहे. सामानाच्या डिलिव्हरीसाठी स्टार्ट अप कंपनी सुरू करण्याचं आवाहन अॅमेझॉननं कर्मचाऱ्यांना केलं आहे. या स्टार्ट अप कंपनीत अॅमेझॉन 10 हजार डॉलरपर्यंतची गुंतवणूक करणार आहे. नोकरी सोडून व्यवसाय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अॅमेझॉन तीन महिन्यांचा पगारदेखील देणार आहे. पार्ट टाइम आणि फुल टाइममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीनं ही 'बिझनेस ऑफर' दिली आहे.
'हे' आहेत भारतातील सर्वाधिक विश्वासू ब्रँड
एखाद्या वस्तूची खरेदी करायची असल्यास सर्वप्रथम ब्रँड पाहिला जातो. ब्रँडेड वस्तू वापरण्याकडेच अनेकांचा जास्त कल असतो. प्रत्येक ब्रँड ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्याने अनेक अनेक गोष्टी करत असतो. डेल हा लॅपटॉप ब्रँड भारतातील सर्वाधिक विश्वासू ब्रँड झाला आहे. त्यानंतर वाहन कंपनी जीप आणि वीमा क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी एलआयसीचा नंबर लागतो. टीआरएच्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. टीआरएच्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्टनुसार, 2019 मध्ये टॉप सात ब्रँडमध्ये एलआयसी ही एकमेव भारतीय कंपनी आहे. टॉप ब्रँडच्या लिस्टमध्ये अॅमेझॉन हा देशाचा चौथा तर अॅपल हा पाचवा सर्वात विश्वासू ब्रँड आहे. अॅपलचा आयफोन हा फोन सीरीजमध्ये सर्वात वर आहे. तर सॅमसंगचा मोबाईल फोन ब्रँड सहाव्या स्थानी आहे. एलजी टेलिव्हिजन सातव्या स्थानी असून कस्टमर इलेक्ट्रॉनिक्स सुपर कॅटेगिरीमध्ये अग्रस्थानी आहे. तर अवीवा लाईफ इन्सुरन्स आठवा विश्वासू ब्रँड ठरला आहे. मारूती सुझुकी नवव्या तर भारतीय स्टेट बँक (एसबीआय) दहाव्या स्थानी आहे.