Join us

Amazon buying MGM: अ‍ॅमेझॉन 'जेम्स बॉन्ड'च्या मालकाला विकत घेणार; पहा कितीला झाली डील?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:55 PM

Amazon To Buy MGM Studios: फिल्मी दुनियेतील 97 वर्षे जुनी कंपनी एमजीएम खरेदी करणार. एमजीएम स्युडिओजची स्थापना मारकस लोए आणि लुईस बी मेयर यांनी जवळपास 97 वर्षांपूर्वी 17 एप्रिल 1924 मध्ये  केली होती.

Amazon buying MGM: लवकरच अ‍ॅमेझॉन एमजीएम कंपनीची खरेदी करणार आहे. दोन्ही कंपन्यांदरम्यान करारावरही सही करण्यात आली आहे. ही डील 8.45 अब्ज डॉलर म्हणजेच 611 कोटी रुपयांना झाली आहे. एमजीएम जवळपास एक शतकापासून सिनेमे बिनविण्याच्या व्यवसायात आहे. (Amazon Agrees to Buy MGM Film Studio for $8.45 Billion)

एमजीएम स्युडिओजची स्थापना मारकस लोए आणि लुईस बी मेयर यांनी जवळपास 97 वर्षांपूर्वी 17 एप्रिल 1924 मध्ये  केली होती. अ‍ॅमेझॉनने ही कंपनी खरेदी केल्यानंतर या कंपनीला आणखी ताकदवर बनविणार आहे. सोबतच अ‍ॅमेझॉनकडून एमजीएमचा वारसा, संपत्ती सांभाळण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. 

जगातील सर्वात मोठी टेलिकम्युनिकेशन कंपनी एटी अँड टी ने एक नवीन मीडिया कंपनी बनविण्यासाठी वार्नर मीडियाला डिस्कव्हरीसोबत आणण्याची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्ससारख्या प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसोबत प्रतिस्पर्धा करणार आहे. 

एमजीएम म्हणजेच मेट्रो गोल्डविन मेयरच्या लायब्ररीमध्ये 4000 हून अधिक फिल्मे आहेत. यामध्ये 12 अँग्री यंग मॅन, बेसिक इन्सि्टंक्ट, क्रीड, जेम्स बॉन्ड, लीगली ब्लॉन्ड, मूनस्ट्रक, पोल्टेरजीस्ट, रेजिंग बुल, रोबोकॉप, रॉकी, साइलेंस ऑफ द लॅब्स, स्टारगेट, थेल्मा अँड लुईस, टॉम्ब राइडर, द मैग्निफिसेंट सेवेन, द पिंक पँथर, द थॉमस क्राउन अफेयर सारखे सिनेमे आहेत. याशिवाय 17 हजारहून अधिक टीव्ही शो आहेत. 

टॅग्स :अ‍ॅमेझॉनहॉलिवूड