ई-कॉमर्स कंपनी Amazon नं आपल्या App चा आयकॉन काही दिवसांपूर्वी बदलला होता. परंतु त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्या आयकॉनवरून Amazon ला ट्रोल केलं. काही नेटकऱ्यांनी त्याची तुलना हिटलरच्या मिशांशी केली होती. त्यानंतर कंपनीनं त्वरित यावर कार्यवाही करत आपला आयकॉन पुन्हा एकदा चेंज केला. फॉक्स टीव्हीच्या वृत्तानुसार हिटलरच्या मिशांशी मिळताजुळता फिडबॅक मिळाल्यानंतर Amazon नं आपल्या अॅप आयकॉनवर असलेल्या निळ्या रिबिनचं डिझाईन पुन्हा बदललं.
कंपनीनं जानेवारी महिन्यात आपला एक नवा अॅप आयकॉन आणला होता. नव्या आयकॉननं त्यानंतर जुन्या आयकॉनची जागा घेतली. यामध्ये Amazon च्या बॉक्सवर वरील बाजूला निळी रिबिन आणि त्याच्या खालच्या बाजूला हसण्याच्या आकारात अॅमेझॉनचा आयकॉन आहे. पाच वर्षांमध्ये Amazon नं पहिल्यांदा यात बदल केला होता.
lmao I completely missed that amazon quietly tweaked its new icon to make it look… less like hitler pic.twitter.com/Jh8UC8Yg3u
— alex hern (@alexhern) March 1, 2021
NEW: @amazon changes their app logo after comparisons are made to Hitler
— the big fellow (@borderfox116) March 2, 2021
pic.twitter.com/8QAjzQ5HwC
परंतु यानंतर काही नेटकऱ्यांनी याची तुलना हिटलरच्या मिशांशी केली. तसंच अनेकांनी सोशल मीडियावर याचा विरोधही करण्यास सुरूवात केली. या नव्या अॅप आयकॉनला अनेकांकडून ट्रोलही करण्यात आलं. परंतु लोकांच्या प्रतिक्रियांनंकर Amazon नं पुन्हा एकदा त्यात बदल केले. "आम्ही नवे आयकॉन डिझाईन केले आहेत. जेव्हा ग्राहक आपल्या फोनवर खरेदी सुरू करतात, ठिक त्याच प्रणामे ते आपल्या दवाज्यावर आपल्या बॉक्सलाही पाहतात," असं Amazon च्या प्रवक्त्यांनी सीएनएनशी बोलताना सांगितलं.