Join us

अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह धमाका, 'या' वस्तूंवर मिळणार बंपर सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 11:58 AM

सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूषखबर आहे.

मुंबई - सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूषखबर आहे. कारण सणांचा मुहूर्त साधत या कंपन्यांनी ग्राहकांसाठी पुन्हा एकदा खास सेल सुरू केला आहे. त्या अंतर्गत ग्राहकांना विविध वस्तूंच्या खरेदीवर भरघोस सूट देण्यात आली आहे. 

अॅमेझॉनचा 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’ सुरू आहे. तर, अॅमेझॉनची प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टनेही 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान 'फेस्टिव्ह धमाका डेज सेल’ची घोषणा केली आहे. यामुळेच दोन्ही कंपन्यांमध्ये निर्माण झालेल्या या स्पर्धेचा ग्राहकांना मात्र चांगलाच फायदा होणार आहे. अॅमेझॉन, फिल्पकार्टवर असलेल्या बिग सेलमध्ये बड्या ब्रँड्सच्या वस्तूंवर दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना मोठी सवलत दिली आहे. 

सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून फर्निचर, कपडे, किचनमधील सामानावर चांगला डिस्काउंट देण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांनी एकमेकांना टक्कर देण्यासाठी विशेषत: स्मार्टफोन्सवर बंपर सूट देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक कंपन्याच्या स्मार्टफोनवरही डिस्काउंटसह मोठी कॅशबॅक ऑफर तसेच एक्सेंज ऑफर देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर Axis बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून शॉपिंग केल्यास 10 टक्के सवलत मिळणार आहे. तर अॅमेझॉनवर ICICI किंवा CITI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास 10 टक्के सवलत मिळणार आहे.  

टॅग्स :अॅमेझॉनफ्लिपकार्टविक्री