Lokmat Money > बिझनेस न्यूज > Amazon-Flipkart वर बंपर डिस्काउंट कसा मिळतो? वस्तू स्वस्तात विकूनही कंपन्या कशा कमवतात नफा

Amazon-Flipkart वर बंपर डिस्काउंट कसा मिळतो? वस्तू स्वस्तात विकूनही कंपन्या कशा कमवतात नफा

Amazon Flipkart Sale : तुम्हाला Amazon आणि Flipkart वर अनेक उत्पादने मोठ्या सवलतीत मिळतात. मात्र, इतका बंपर डिस्काउंट कंपन्या कशा देतात? हे तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:54 AM2024-09-25T10:54:25+5:302024-09-25T10:55:19+5:30

Amazon Flipkart Sale : तुम्हाला Amazon आणि Flipkart वर अनेक उत्पादने मोठ्या सवलतीत मिळतात. मात्र, इतका बंपर डिस्काउंट कंपन्या कशा देतात? हे तुम्हाला माहिती आहे का?

amazon flipkart sale how companies sell product at heavy discount | Amazon-Flipkart वर बंपर डिस्काउंट कसा मिळतो? वस्तू स्वस्तात विकूनही कंपन्या कशा कमवतात नफा

Amazon-Flipkart वर बंपर डिस्काउंट कसा मिळतो? वस्तू स्वस्तात विकूनही कंपन्या कशा कमवतात नफा

Amazon Flipkart Sale : ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ग्राहकांची ही नस ओळखून ई कॉमर्स कंपन्या वर्षभर वेगवेगळ्या ऑफर्स आणत असतात. येत्या २ दिवसात फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’ आणि अ‍ॅमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’ची सुरुवात होत आहे. या सेलमध्ये नेहमीप्रमाणे आकर्षक ऑफर्स आणि बंपर सूट देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्हीही ऑनलाईन खरेदी करत असाल तर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल. जर या कंपन्या इतक्या स्वस्तात वस्तूंची विक्री करतात मग नफा कसा कमावतात?

छोट्या व्यावसायिकांना प्लॅटफॉर्म
छोट्या व्यावसायिकांना अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स कंपन्या आपला फ्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देतात. मोठं शॉप किंवा दुकानाच्या भाड्याची बचत होत असल्याने हे व्यावसायिक बाजारभावापेक्षा कमी किमतीत आपली वस्तूची विक्री करू शकतात. यामुळे दुकानदारासोबत ग्राहकाचाही फायदा होता. अशा व्यावसायिकांचे उत्पादने वेबसाईट्सवर विक्रीसाठी ठेवण्यासाठी ई कॉमर्स कंपन्या शुल्क आकारतात. यातून त्यांची खरी कमाई होते. दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्वस्त दरात वस्तू विकण्यासाठी स्थानिक व्यवसाय मालक आणि इतर एमएसएमईशी (Micro, Small and Medium Enterprises) संपर्क साधतात. अलीकडेच, ॲमेझॉनने म्हटले होते की कोट्यवधी ग्राहक एमएसएमई आणि स्थानिक व्यवसायांची उत्पादने पसंत करत आहेत.

वस्तूंवर इतकी सूट कशी देतात?
कोणत्याही कंपनीची वेबसाईट बघितली तर तिथल्या प्रोडक्टची किंमत Amazon-Flipkart पेक्षा तुलनेत जास्त पाहायला मिळते. मग प्रश्न पडतो की या कंपन्या आपली उत्पादने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्वस्तात का विकतात? याचे कारण अधिक माल विकून अधिक नफा मिळवणे आहे. यात नफ्याचं मार्जिन कमी करून वस्तूंची मोठ्या संख्येत विक्री केली जाते. Amazon किंवा Flipkart वर ग्राहकांची मोठी संख्या मिळते. वस्तूची किंमत जरी कमी केली तरी संख्या मोठी असल्याने नफाही वाढतो. बऱ्याचदा या ई कॉमर्स कंपन्या खूप मोठ्या संख्येत अशा वस्तू होलसेलमध्ये खरेदी करतात. अशा वस्तूंवर मग सूट देऊनही चांगला नफा कमावता येतो.

बँक ऑफर्सचा फायदा
जवळपास सर्व ई कॉमर्स कंपन्यांच्या साईट्सवर कुठल्या ना कुठल्या बँकेची ऑफर मिळते. यामध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड दोन्हीवर आकर्षक ऑफर्स असतात. याचा फायदा अशा ई कॉमर्स कंपन्यांना मिळतो. वास्तविक, सेलमध्ये दिसत असलेली किंमत ही सर्व डिस्काउटंनंतर आलेली असते. यामध्ये बँक ऑफर्सचाही समावेश असतो. त्यामुळे कंपन्या उत्पादने स्वस्तात विकूनही भरघोस नफा कमावतात.
 

Web Title: amazon flipkart sale how companies sell product at heavy discount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.