Lokmat Money > बिझनेस न्यूज > Amazon चे संस्थापक Jeff Bezos उद्या सीईओ पद सोडणार; जाणून घ्या, काय आहे पुढील योजना?

Amazon चे संस्थापक Jeff Bezos उद्या सीईओ पद सोडणार; जाणून घ्या, काय आहे पुढील योजना?

Jeff Bezos : जेफ बेझोस यांची जागा आता अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्यूटिंग बिझनेसचे संचालन करणारे अँडी जेसी (Andy Jassy) घेणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 04:05 PM2021-07-04T16:05:45+5:302021-07-04T16:09:01+5:30

Jeff Bezos : जेफ बेझोस यांची जागा आता अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्यूटिंग बिझनेसचे संचालन करणारे अँडी जेसी (Andy Jassy) घेणार आहेत.

amazon founder jeff bezos to step down as companys ceo on july 5 to focus on space mission | Amazon चे संस्थापक Jeff Bezos उद्या सीईओ पद सोडणार; जाणून घ्या, काय आहे पुढील योजना?

Amazon चे संस्थापक Jeff Bezos उद्या सीईओ पद सोडणार; जाणून घ्या, काय आहे पुढील योजना?

नवी दिल्ली : एका ऑनलाइन बुकस्टोअरच्या स्वरुपात अ‍ॅमेझॉनची (Amazon) सुरूवात केली आणि शॉपिंगच्या दुनियेत अ‍ॅमेझॉनची वेगळी ओळख निर्माण करणारे कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos), कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत. 5 जुलै रोजी ते राजीनामा देणार आहेत. त्यामुळे जेफ बेझोस यांची जागा आता अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्यूटिंग बिझनेसचे संचालन करणारे अँडी जेसी (Andy Jassy) घेणार आहेत.

दरम्यान, जवळपास 30 वर्षे मुख्य सीईओ पदावर राहिल्यानंतर जेफ बेझोस आता कार्यकारी अध्यक्षपदाच्या नव्या भूमिकेत असतील. जेफ बेझोस यांनी फेब्रुवारीच्या सुरूवातीला सांगितले होते की, इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि त्यांची कंपनी ब्लू ओरिजिनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अ‍ॅमेझॉनचे सीईओ पद सोडत आहे.

स्पेस फ्लाइट मिशनवर काम करतायेत जेफ बेझोस
जेफ बेझोस सध्या आपल्या नवीन सेक्टरवर  फोकस करत आहेत. बेझोस आता स्पेस फ्लाइट (Space Flight) मिशनवर काम करत आहेत. ते त्यांची कंपनी ब्लू ओरिजिन (Blue Origin) द्वारे या महिन्यात संचालित होणाऱ्या पहिल्या स्पेस फ्लाइटमधून उड्डाण घेणार आहेत.


20 जुलैला अंतराळात उड्डाण भरेल न्यू शेफर्ड अंतराळयान
गेल्या काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर जेफ बेझोस यांनी म्हटले होते की, त्यांचे भाऊ आणि लिलावातील एक विजेता ब्लू ओरिजिनच्या 'न्यू शेफर्ड' अंतराळयानामध्ये 20 जुलै रोजी उड्डाण घेणार आहेत. या अंतरावारीमध्ये टेक्सास ते अवकाशात संक्षिप्त प्रवास केला जाणार आहे. अपोलो 11 च्या चंद्रावर आगमन झाल्याचा वर्धापनदिन 20 जुलै रोजी साजरा केला जातो. 

'पृथ्वीला अंतराळातून पाहणे, तुम्हाला बदलून टाकते, या ग्रहाशी तुमचं नाते बदलून टाकते. मी या फ्लाइटमध्ये चढू इच्छित आहे, कारण ही अशी एक गोष्ट आहे. जी मला नेहमी करायची इच्छा होती. हा एक थरार आहे. हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे', असे असे जेफ बेझोस यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले होते.

Web Title: amazon founder jeff bezos to step down as companys ceo on july 5 to focus on space mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.