Lokmat Money > बिझनेस न्यूज > Freedom Sale : अॅमेझॉनवर सवलतींची खैरात

Freedom Sale : अॅमेझॉनवर सवलतींची खैरात

9 ते 12ऑगस्ट दरम्यान एसबीआयच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 10 टक्क्यांची सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 01:22 PM2018-08-09T13:22:41+5:302018-08-09T13:23:44+5:30

9 ते 12ऑगस्ट दरम्यान एसबीआयच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 10 टक्क्यांची सूट

Amazon Freedom Sale | Freedom Sale : अॅमेझॉनवर सवलतींची खैरात

Freedom Sale : अॅमेझॉनवर सवलतींची खैरात

मुंबई : देशभरात स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरु असतानाच अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर धमाकेदार सवलतींमध्ये विक्री सुरु झाली आहे. हा सेल 9 ते 12ऑगस्ट दरम्यान असणार आहे. 
 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर विविध मॉलमध्ये सवलतींच्या दरात विक्री सुरु होते. याचबरोबर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरही मोठ्या प्रणावर सवलती दिल्या जातात. अॅमेझॉनने आजपासून Freedom Sale सुरु केला असून एसबीआयच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 10 टक्क्यांची सूट जारी केली आहे. याचबरोबर टीव्ही, फ्रिज आणि इतर घरगुती वापराच्या वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. 
काही मोबाईलवर 40 टक्के सवलत तर काही उत्पादनांवर 50 टक्के सवलत मिळत आहे. वनप्लस 6 या मोबाईलवर एक्सचेंज ऑफरद्वारे 2 हजार रुपयांचा जादाची सूट देण्यात येत आहे. याचबरोबर नो कॉस्ट ईएमआयवरही उत्पादने उपलब्ध करण्यात आली आहेत. नुकतेच लाँच झालेले मोबाईल ऑनर 7X, 10 और E हे निम्म्या किंमतीमध्ये मिळत आहेत. 
कपड्यांवरही मोठ्या प्रमाणावर सूट देण्यात येत आहे. जवळपास 500 ब्रँडवर ही सूट आहे. घरगुती वापराच्या टीव्ही, वॉशिंग मशिन, एसी यावरही 70 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. 

Web Title: Amazon Freedom Sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.