Join us

Amazon-Future Deal: अ‍ॅमेझॉनला दुहेरी झटका! फ्युचर डील हातची गेली, वर 200 कोटींचा दंड बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 8:44 PM

Amazon-Future DeaL फ्युचर कुपन्सने केलेल्या तक्रारीवरून सुनावणी झाली. यामध्ये फ्युचर ग्रुपमध्ये अ‍ॅमेझॉन करत असलेली गुंतवणूक रद्द व्हावी असे कुपन्सला वाटत होते.

अ‍ॅमेझॉनला फ्युचर ग्रुप डीलमध्ये मोठा झटका बसला आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competition Commission of India) म्हणजेच सीसीआयने फ्युचर कुपन्समध्ये अमेझॉनच्या गुंतवणुकीला दिलेली मंजुरी रद्द केली आहे. एवढेच नाही तर या मोठ्या कंपनीवर फसवणूक केल्याच्या आरोपाखाली 200 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 

फ्युचर कुपन्सने केलेल्या तक्रारीवरून सुनावणी झाली. यामध्ये फ्युचर ग्रुपमध्ये अ‍ॅमेझॉन करत असलेली गुंतवणूक रद्द व्हावी असे कुपन्सला वाटत होते. सीसीआयने आपल्या आदेशात म्हटले की, या डीलचे पुन्हा आकलन केले जावे. अ‍ॅमेझॉनने 60 दिवसांच्या आत फॉर्म 2 पुन्हा फाईल करावा. यामध्ये सर्व माहिती विस्ताराने नमूद करावी. अ‍ॅमेझॉनने चुकीची आणि खोटी माहिती दिली आहे, असे 57 पानी आदेशात म्हटले आहे. 

16 नोव्हेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने सीसीआयला अ‍ॅमेझॉन फ्युचर डील रद्द करण्याचे आदेश दिले होते. यासाठी सीसीआयला दोन आठवड्यांचा वेळ दिला होता. याआधी कॅटनेदेखील सीसीआयविरोधात पीआयएल दाखल केली होती. यामध्ये म्हटले होते की, त्यांनी अॅमेझॉनला जूनमध्येच कारण दाखवा नोटीस जारी केली होती., मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

टॅग्स :अ‍ॅमेझॉन