लंडन : कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणींत आलेल्या अमेरिका, इंग्लड आणि इतर मोठ्या व श्रीमंत देशांनी ॲमेझॉन आणि गुगलसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून जास्त पैसा वसूल करण्याचे आणि त्यांना दिली जाणारी प्रोत्साहनपर रक्कम कमी करण्याचे ठरवले आहे. शनिवारी या देशांनी याबाबत महत्त्वाचा करार केला.
ग्लाेबल कंपनी कर (कार्पोरेट टॅक्स) कमीत कमी १५ टक्के लागू करण्यास जी सेव्हन विकसित देशांनी पाठिंबा दिल्यानंतर कोरोनामुळे रिकाम्या झालेल्या या देशांच्या तिजोऱ्यांत शेकडो अब्जावधी डॉलर्स येऊ शकतील. जी सेव्हन देशांच्या अर्थमंत्र्यांच्या येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ब्रिटनचे अर्थमंत्री रिषी सुनक यांनी ट्विटरवर म्हटले की, या निर्णयामुळे इंग्लडमधील कंपन्यांना स्पर्धेसाठी अधिक समान संधी उपलब्ध होईल आणि कर चुकवणाऱ्यांना शोधणे साेपे
जाईल.
ॲमेझॉन, गुगलला मिळणार प्रोत्साहनपर रक्कम कमी, जी सेव्हन देशांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला
Amazon, Google : ग्लाेबल कंपनी कर (कार्पोरेट टॅक्स) कमीत कमी १५ टक्के लागू करण्यास जी सेव्हन विकसित देशांनी पाठिंबा दिल्यानंतर कोरोनामुळे रिकाम्या झालेल्या या देशांच्या तिजोऱ्यांत शेकडो अब्जावधी डॉलर्स येऊ शकतील.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 06:08 AM2021-06-07T06:08:24+5:302021-06-07T06:09:26+5:30