Join us

Amazon Great Freedom Festival सेल होणार सुरू; मोबाईल, लॅपटॉप्ससह सर्व वस्तूंवर भरघोस सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 3:44 PM

Amazon नं Great Freedom Festival ची केली घोषणा. स्टेट बँकेच्या कार्डधारकांसाठी असणार विशेष ऑफर. मोबाईल फोन्सवरही ४० टक्क्यांपर्यतची सूट.

ठळक मुद्देAmazon नं Great Freedom Festival ची केली घोषणा. स्टेट बँकेच्या कार्डधारकांसाठी असणार विशेष ऑफर.मोबाईल फोन्सवरही ४० टक्क्यांपर्यतची सूट.

Amazon नं Great Indian Festival सेलची घोषणा केली आहे. अनेक डील्स आणि ऑफर असलेला अॅमेझॉनचा हा सेल ५ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या दरम्यान चालतो. अॅमेझॉनच्या या सेलमघ्ये इलेक्ट्रॉनिक्स, लॅपटॉप, कॅमेरा, फॅशन आणि ब्यूटी, होम अँड किचन आणि टीव्ही, मोबाईल फोन्ससह सर्व प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय अॅमेझॉननं स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड होल्डर्ससाठीही विशेष ऑफर आणली आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकांनी EMI वर वस्तूची खरेदी केल्यास ग्राहकांना Amazon Great Freedom Festival सेलमध्ये १० टक्क्यांचा इन्स्टन्ट डिस्काऊंटही मिळणार आहे. 

कॅमेऱ्यावर ६० टक्क्यांपर्यंत सूटAmazon Great Freedom Festival Sale मध्ये ग्राहकांना कॅमेऱ्यांवर ६० टक्क्यांपर्यंत, तर लॅपटॉप्सवर ३० हजारांपर्यंतची सूट गेण्यात येणार आहे. याशिवाय स्मार्ट सिक्युरिटी कॅमेऱ्यांवरही ६० टक्क्यांपर्यंतची सूट असेल. याशिवाय हेडफोन्स, म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्स, प्रोफेशनल ऑडियो, स्पीकर्सवरही ६० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. मोबाईलवरही ६० टक्क्यांपर्यंत, तर टॅब्सवरही ४५ टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळेल. 

स्मार्टफोनवरही भरघोस सूटAmazon Great Freedom Festival Sale मध्ये स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर ४० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. OnePlus Nord 2 5G, OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10T 5G, Redmi Note 10s, Mi 11x, Samsung M21 2021, Samsung M32, Samsung M42 5G, iQOO Z3 5G, iQOO 7, Tecno Camon 17 Series आणि Tecno Spark Go सह अनेक स्मार्टफोन्सवही भरघोस ऑफर्स मिळतील. याशिवाय ग्राहकांना स्मार्ट टीव्हीवरही मोठी सूट मिळणार आहे. 

टॅग्स :अ‍ॅमेझॉनस्मार्टफोनलॅपटॉपमोबाइलओप्पोविवोशाओमी