नवी दिल्ली : अॅमेझॉन इंडियाने (Amazon India) ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Great Indian Festival) सेलची तारीख बदलली आहे. यापूर्वी फ्लिपकार्ट सेलची तारीखही बदलण्यात आली होती. सेलची तारीख बदलणे हे दर्शवते की, या दोन्ही ई-कॉमर्स साइट स्पर्धेसाठी तयार आहेत. (amazon great india festival sale dates changed after flipkart announces date change)
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलचा (Amazon Great Indian Festival) सेल आता 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) मेंबर्ससाठी हा सेल एक दिवस आधी सुरू होईल. या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सवलत दिली जाईल. फ्लिपकार्टच्या घोषणेनंतर अॅमेझॉनने नवीन तारीख जाहीर केली आहे. फ्लिपकार्टने यापूर्वी 7 ऑक्टोबरपासून सेलची घोषणा केली होती.
आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजचा (Flipkart Big Billion Days) सेल 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 10 ऑक्टोबरपर्यंत असेल. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Amazon Great Indian Festival) सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, अॅक्सेसरीज आणि इतर प्रोडक्ट्सवर सूट देण्यात येणार आहे. याबाबत कंपनीने टीझर करायला सुरूवात केली आहे. टीझरमध्ये कंपनी अनेक डील्सबाबत सांगत आहे.
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Amazon Great Indian Festival) सेलमध्ये सॅमसंग, वनप्लस, अॅपल आणि इतर स्मार्टफोनवर बंपर सवलत दिली जाईल. अमेझॉनवर रिलीज झालेल्या टीझरनुसार, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान OnePlus 9 Pro, iPhone 11, Redmi Note 10 Pro Max, Mi 10i, Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 वर सवलत दिली जाईल.
याशिवाय, कंपनी लवकरच अनेक नवीन डील्सबाबत घोषणा करेल. कॅमेरा प्रेमींसाठीही या सेलमध्ये एक उत्तम ऑफर असणार आहे. कंपनीने याविषयी आधीच टीझर केला आहे.