नवी दिल्ली : अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची सुरुवात 17 ऑक्टोबरपासून होणार आहे. कंपनीने याची घोषणा केली आहे. म्हणजेच, अॅमेझॉन सेलची सुरुवात फ्लिपकार्ट सेलच्या दुसर्या दिवसापासून सुरू होईल. मात्र, अॅमेझॉन सेलचा एक्सेस प्राइम मेंबर्सना 24 तास अगोदर दिला जाणार आहे. म्हणजेच, इतर ग्राहकांच्या एक दिवस अगोदरच अॅमेझॉनचे प्राइम मेंबर्स असलेले ग्राहक सेलचा लाभ घेऊ शकतील.
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये खरेदी करणार्या ग्राहकांना एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय ट्रांजक्शनवर 10 टक्के तात्काळ सूट मिळणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून पहिली ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना किमान एक हजार रुपयांच्या खरेदीवर पाच टक्के अतिरिक्त कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे.
या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान अॅमेझॉनद्वारे छोट्या व्यवसायाची जाहिरात देखील केली जाणार आहे. त्यांच्या उत्पादनांवर सूट दिली जाईल. सेलदरम्यान, OnePlus 8T आणि Samsung Galaxy S20 FE यासारख्या काही नवीन स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
अॅमेझॉनने जाहीर केलेल्या डेडिकेटेड मायक्रोसाइटनुसार, सेलदरम्यान इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 6,000 डील्स केल्या जाणार आहे. यासह मोबाइल फोन आणि अॅक्सेसरीजवरही अनेक आकर्षक ऑफर दिल्या जाणार आहेत. गेमिंग उपकरणांवरही 55 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. त्याचबरोबर सॉफ्टवेअर प्रोडक्टसवर अॅमेझॉनकडून 70 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
याचबरोबर, अॅमेझॉन कंपनी Echo, Fire TV आणि Kindle डिव्हाइसवर 50 टक्के सूट देणार आहे. तर टीव्ही आणि घरगुती उपकरणांवर 65 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. अॅमेझॉनने अनेक प्रोडक्ट्वर नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन देण्यासाठी Bajaj Finserv सोबत भागीदारी केली आहे. दरम्यान, सेल कधी संपणार, याबाबत कंपनीकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.