Join us

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सुरू होत आहे ८ ऑक्टोबरपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 6:57 AM

सर्व ग्राहक ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो ‘ ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ येत्या ८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

बंगळुरु : सर्व ग्राहक ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो ‘ ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ येत्या ८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. प्राइम मेंबर्ससाठी हा चोवीस तास आधीच खुला असेल. यात ग्राहकांना २५ हजारांहून अधिक उपयोगी वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक सवलती तसेच ऑफर्स देण्यात येणार आहेत.

स्मार्टफोन, हेडफोन, लॅपटॉप, टीव्ही, किचन-होम अप्लायन्सेस, फॅशन आणि ब्युटी प्रोडक्ट आदी वस्तू सेलमध्ये ग्राहकांना खरेदी करता येतील. अनेक वस्तू नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करण्याची सुविधा दिली जाईल. काही उत्पादनांसाठी एक्स्चेंज ऑफरही दिली जाईल.  ग्राहकांच्या सुविधेसाठी ॲमेझॉनची सेवा इंग्रजी यासह हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम, कनडा, बांगला आणि मराठी या भाषांमध्ये दिली जाणार आहे.

ॲमेझॉनची सर्व उत्पादने १९ हजारांहून अधिक ठिकाणी घरपोच पाठविली जातील. ग्राहकांना उपकरणांचे इन्स्टॉलेशन, ट्रबल शूटिंग आणि दुरुस्ती आदी सेवा दिल्या जातील. ॲमेझॉनचे इंडिया कंझुुमर बिजनेसचे  उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक मनीष तिवारी म्हणाले,  देशभरातील ग्राहकांच्या घरी बॉक्स ऑफ हॅपिनेस पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. (वा. प्र.)

टॅग्स :अ‍ॅमेझॉन