Lokmat Money > बिझनेस न्यूज > तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी 

तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी 

गेल्या काही दिवसांमध्ये अ‍ॅमेझॉनचा व्यवसाय हा वेगाने वाढत आहे. कंपनीने एप्रिल ते जूनच्या दरम्यान विक्रमी कमाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 09:37 AM2020-09-15T09:37:10+5:302020-09-15T09:48:08+5:30

गेल्या काही दिवसांमध्ये अ‍ॅमेझॉनचा व्यवसाय हा वेगाने वाढत आहे. कंपनीने एप्रिल ते जूनच्या दरम्यान विक्रमी कमाई केली आहे.

amazon to hire 100000 to keep up with online shopping surge | तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी 

तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी 

नवी दिल्ली -  नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन तब्बल एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. कंपनीने सोमवारी याबाबत घोषणा केली आहे. ही नवीन भरती पार्ट टाईम आणि फुल टाईम कामासाठी होणार असून शिपिंग आणि सॉर्टिंग विभागात असणार आहे. एका तासासाठी एक हजारांहून अधिक पैसे देण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये अ‍ॅमेझॉनचा व्यवसाय हा वेगाने वाढत आहे. कंपनीने एप्रिल ते जूनच्या दरम्यान विक्रमी कमाई केली आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी घराबाहेर पडून सामान घेण्याऐवजी ऑनलाईन वस्तू खरेदीवर अधिक भर दिला आहे. कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला देखील 1 लाख 75हजार लोकांना कामावर घेतलं होतं. तसेच अ‍ॅमेझॉनने गेल्या आठवड्यात कॉर्पोरेट आणि टेक्निकल गोष्टींसाठी 33,000 कामगारांची आवश्यकता असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी मिळाली आहे. 

अ‍ॅमेझॉनमध्ये सुरुवातीचं वेतन हे प्रतितास 15 डॉलर

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 100 नवीन गोदामे आणि काही इतर कामांसाठी माणसांची गरज आहे. या गोदामांचं काम पाहणाऱ्या एलिसिया बोलर डेविस यांनी अ‍ॅमेझॉन काही शहरांमध्ये 1,000 डॉलर साइन इन बोनस देखील देत असल्याची माहिती दिली आहे. अ‍ॅमेझॉनमध्ये सुरुवातीचं वेतन हे प्रतितास 15 डॉलर आहे. कोरोनाच्या काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने अ‍ॅमेझॉनला मोठा फायदा झाल्याचं म्हटलं जात आहे. 

योग्य नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज

अ‍ॅमेझॉनलाच्या गोदामांमध्ये अनेक गोष्टी या अस्तव्यस्त पडलेल्या असतात. त्यामुळे हे सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज आहे. त्यासाठी कंपनीने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच 1 लाख लोकांची भरती करण्याची तयारी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी  ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉन इंडिया आपल्या ग्राहक सेवा (कस्टमर सर्व्हिस) शाखेत 20 हजार हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे अशी कंपनीच्या वतीने अधिकृतरीत्या ही घोषणा करण्यात आली होती. ही भरती हैदराबाद, पुणे, कोईमतूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मंगळुरू, इंदूर, भोपाळ आणि लखनौ या शहरांसाठी होणार आहे.

लय भारी! Amazon लवकरच करणार ड्रोनने डिलिव्हरी, फक्त 30 मिनिटांत सामान येणार घरी

अ‍ॅमेझॉन लवकरच ड्रोनने सामानाची डिलिव्हरी करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे फक्त 30 मिनिटांत ड्रोनच्या मदतीने सामान घरी येणार आहे. अ‍ॅमेझॉनला पार्ट 135 एअर कॅरिअर सर्टिफिकेट मिळालं आहे. त्यामुळे कंपनी प्राइम एअर ड्रोन्स वापरू शकते. अमेरिकेच्या एफएएने अ‍ॅमेझॉनला ड्रोनमार्फत पॅकेज डिलिव्हरीसाठी परवानगी दिल्याचं सांगितलं आहे. अ‍ॅमेझॉन सध्या ड्रोनचं उड्डाण आणि इतर गोष्टींचं परीक्षण करत आहे. सामानाची ड्रोनमार्फत डिलिव्हरी नेमकी कधी सुरू केली जाणार याबाबत ग्राहकांना सध्या सांगू शकत नसल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. ड्रोनच्या मदतीने सामानाची डिलिव्हरी करण्याच प्रयत्न सुरू आहे. मात्र हे करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

महत्त्वाच्या बातम्या

जय जिजाऊ, जय शिवराय! योगी सरकारच्या 'त्या' निर्णयावर फडणवीसांचं खास ट्विट, म्हणाले...

"मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जातोय"

"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान सुरू, हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत"

Web Title: amazon to hire 100000 to keep up with online shopping surge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.