नवी दिल्ली : देशात डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी अॅमेझॉन (Amazon), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि अॅक्सिस बँक (Axis Bank) या एनपीसीआय (National Payments Corporation of India)च्या पर्यायाने एकत्र येऊ शकतात. म्हणजेच या तिन्ही कंपन्या नवीन NUEs एकत्र आणण्याची योजना आखत आहेत. सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय UPI (Unified Payments Interface) NPCI द्वारे चालविण्यात येत आहे. (amazon, icici bank and axis bank ready with nue plan to rival upi know about the plan)
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, पाइन लॅब्स (Pine Labs) आणि बिलडेस्क (BillDesk) यांच्यासह तीन संस्थांनी भारतात डिजिटल व्यवहार हाताळण्यासाठी एक नवीन संस्था new umbrella entity (NUE) तयार केली आहे. मार्केटमध्ये याची स्पर्धा एनपीसीआयसोबत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या सर्व डिजिटल व्यवहार एनपीसीआयद्वारे हाताळले जातात.
लवकरच सादर करणार योजनाअॅमेझॉन, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक एक-दोन दिवसांत आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) समोर आपल्या योजनेची रूपरेषा सादर करणार आहे. दरम्यान, बोली लावण्याची अंतिम मुदत होण्यापूर्वीच ते आरबीआयसमोर सादर करावे लागेल. जर बोली मंजूर झाल्यास याचा अर्थ असा होईल की, जानेवारी 2021 मध्ये 2 बिलियनहून अधिक व्यवहार असलेल्या यूपीआयचे वर्चस्व लवकरच संपुष्टात येईल.
जागतिक दर्जाचे नेटवर्कइकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, "आमचा प्रयत्न जागतिक दर्जाचे नेटवर्क तयार करण्याचा आहे, जे छोट्या उद्योगांना आणि व्यापाऱ्यांना पैसे भरण्यास मदत करेल. यामुळे त्यांचा वेळही वाचणार आहे. गेल्या दोन महिन्यांत या दिशेने जोर पकडला असून सध्या अॅग्रीमेंट आणि कागदपत्रे बाकी आहेत."
NPCI ची स्थापना 2008 मध्ये झाली होतीएनपीसीआयची स्थापना 2008 मध्ये आरबीआयद्वारे करण्यात आली होती. भारतात किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट प्रक्रियेला चालना देण्यासाठी आरबीआयने ही प्रणाली सुरू केली होती. एनपीसीआयला 56 बँकांनी पाठिंबा दर्शविला आहे. यासह, यूपीआय आणि रुपे देखील या बँकाद्वारे केले जाते. तसेच, FASTag च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंट देखील उपलब्ध आहे.
दरम्यान, आरबीआयने नवीन किरकोळ पेमेंट सिस्टमसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची घोषणा केली आहे. NUEs आल्यानंतर NPCI ला बॅकफूटवर सुद्धा ठेवले जाऊ शकते.