Amazon Prime वर अनेक जण मुव्ही किंवा वेबसीरिजचा आनंद घेत असतील. पण आता यावर वेब सीरिज पाहण्याव्यतिरिक्त भविष्य काळात तुम्ही मल्टीप्लेक्समध्ये बसूनही चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. Amazon India एन्टरटेन्मेंट बिझनेसला डायव्हर्सिफाय करण्याच्या विचारात आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार Amazon देशातील सर्वात मोठी मल्टीप्लेक्स चेन शुमार आयनॉक्स लेशरसह काही फिल्म आणि मीडिया डिस्ट्रीब्युशन प्लेअर्सच्या अधिग्रहणाच्या तयारीत आहे.
जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेझोस यांची कंपनी Amazon ही यापैकी काही व्यवसायांच्या अधिग्रहणाच्या विचारात आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार यामध्ये जे बिझनेस सामील आहेत त्यामध्ये Inox Leisure देखील सामील आहे. परंतु आयनॉक्स लेशरनं बीएसई फायलिंगमध्ये स्पष्टीकरण देत अॅमेझॉन आणि आयनॉक्स लेशरमध्ये अशाप्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही आणि यापूर्वीही कोणती चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
प्राईम ओटीटीची ग्रोथ अपेक्षेपेक्षा कमी
अॅमेझॉन २०१६पासून भारतात ओटीटी बिझनेस चालवत आहे. परंतु जितकी अपेक्षा होती तितकी याची ग्रोथ झाली नाही. गेल्या वर्षी २०२० मध्ये सुरूवातीच्या सहा महिन्यांत अॅमेझॉन प्राईमची ग्रोथ उत्तम होती. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार कंपनीची एन्टरटेन्मेंट बिझनेस स्पेसमध्ये तीन ते चार व्यहारांबद्दल चर्चा सुरू आहेत. त्यापैकी काही डेस्ट्रेस्ड अॅसेस्टही आहेत.
महासाथीचा Inox Leisure वर परिणाम
कोरोनाच्या महासाथीपासूनच आयनॉक्स लेशरला मोठं नुकसान सोसावं लागत आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहिती कंपनीला ९० कोटी रूपयांचा महसूल मिळाला होता. जो गेल्या २०२० च्या समान तिमाहिच्या तुलनेत ७५ टक्के कमी होता. दरम्यान, कंपनीला ९३.७ कोटी रूपयांचा नेट लॉस झाला होता.
अॅमेझॉन इंडियानं महासाथीच्या पूर्वी भारतात १५० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. यापैकी अधिक रक्कमेची गुंतवणूक ही ई-कॉमर्समध्ये करण्यात आली होती. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार एन्टरटेन्मेंट स्पेसमध्ये अॅमेझॉनची डील पूर्ण झाली तर ते इ-कॉमर्समधून थोडा फोकस आपल्या एन्टरटेन्मेंटवर वाढवू शकते.