Join us  

'जे ऑफिसला येत नसतील, त्यांना कामावरून काढून टाका', Amazon ने जारी केला नवा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 7:45 PM

कोरोनाचा धोका संपला असला तरी अजूनही लोक ऑफिसला यायला तयार नसल्याचे दिसतंय

Amazon Workers Policy , Work From Office : कोरोनाचे युग संपले, तरीही कर्मचारी कार्यालयात जाण्यास तयार नाहीत असा काहीसा प्रकार अजूनही सुरू आहे. तशातच आता अ‍ॅमेझॉन (Amazon) कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे की जो कर्मचारी कार्यालयात येत नाहीत त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागू शकते. कंपनीने कर्मचाऱ्यांना मे महिन्यापासून आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येण्यास सांगितले आहे. मात्र, अनेक कर्मचारी हा नियम पाळत नाहीत. हे लक्षात घेऊन अ‍ॅमेझॉन आता कडक नियमांचे पालन करणार असल्याचे बोलले जात आहे. अ‍ॅमेझॉनने ऑफिसमध्ये परत जाण्याचे धोरण जारी केले आहे आणि जो कर्मचारी त्याचे पालन करत नाही त्याला नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

जागतिक स्तरावर नवे नियम

इनसाइडरच्या रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने व्यवस्थापकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचे स्वातंत्र्यही दिले आहे. कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येण्याच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध हे पाऊल उचलले जाऊ शकते. कंपनीने जागतिक स्तरावरील व्यवस्थापकांना हे नियम जारी केले आहेत.

तीन टप्प्याची नियमावली

जे लोक कार्यालयात येत नाहीत त्यांना ताबडतोब कार्यमुक्त करण्यास सांगितले गेलेले नाही. कंपनीने व्यवस्थापकांना 3 टप्प्याची प्रक्रिया असणार आहे. पहिल्या टप्प्यात व्यवस्थापकाला त्याच्या कर्मचार्‍यांशी खाजगीत संभाषण करावे लागेल. दुसर्‍या टप्प्यात, व्यवस्थापकाला कर्मचार्‍यासोबत एक किंवा दोन आठवड्यांत एक बैठक निश्चित करावी लागेल आणि या बैठकीनंतर, त्यांना कार्यालयात परत येण्याचा इशारा द्यावा लागेल आणि कार्यालयात न येण्याचे वैध कारण जाणून घ्यावे लागेल. जर या दोन टप्प्यांनंतर कर्मचारी कार्यालयात आला नाही आणि कार्यालयात येण्याचे वैध कारण माहित नसेल तर व्यवस्थापकाला तिसरी पायरी अवलंबावी लागेल. या शेवटच्या टप्प्यात, एचआरचा सहभाग असावा आणि एकतर लेखी चेतावणी दिली जाऊ शकते किंवा कारवाई केली जाऊ शकते आणि टर्मिनेशन केले जाऊ शकते.

जवळच्या कार्यालयात रिपोर्टिंग करा

कंपनीने दुर्गम भागातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या घराजवळील कार्यालयात जाण्यास सांगितले आहे. यासह, तुम्ही तुमच्या टीमचे बहुतेक कर्मचारी काम करत असलेल्या ऑफिसमध्ये देखील जाऊ शकता, असेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :अ‍ॅमेझॉननोकरी