Lokmat Money > बिझनेस न्यूज > फेस्टिव्ह सिझनपूर्वी Amazon कडून मराठमोळ्या ग्राहकांना नवी सुविधा; आता मराठीतही Shopping करता येणार 

फेस्टिव्ह सिझनपूर्वी Amazon कडून मराठमोळ्या ग्राहकांना नवी सुविधा; आता मराठीतही Shopping करता येणार 

Amazon Shopping In Marathi : फेस्टिव्ह सिझनपूर्वी Amazon कडून ग्राहकांना आणि विक्रेत्यांना मराठीतून खरेदी विक्री करण्याची देण्यात आली सुविधा.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:08 PM2021-09-20T14:08:39+5:302021-09-20T14:29:07+5:30

Amazon Shopping In Marathi : फेस्टिव्ह सिझनपूर्वी Amazon कडून ग्राहकांना आणि विक्रेत्यांना मराठीतून खरेदी विक्री करण्याची देण्यात आली सुविधा.

amazon launches service in marathi tamil telugu malyalam regional language festive season shopping | फेस्टिव्ह सिझनपूर्वी Amazon कडून मराठमोळ्या ग्राहकांना नवी सुविधा; आता मराठीतही Shopping करता येणार 

फेस्टिव्ह सिझनपूर्वी Amazon कडून मराठमोळ्या ग्राहकांना नवी सुविधा; आता मराठीतही Shopping करता येणार 

Highlightsफेस्टिव्ह सिझनपूर्वी Amazon कडून ग्राहकांना आणि विक्रेत्यांना मराठीतून खरेदी विक्री करण्याची देण्यात आली सुविधा.

सणासुदीच्या काळात अनेक ग्राहक ऑनलाइन शॉपिंगलाही पसंती देत असतात. ई-कॉमर्स कंपन्या दिवाळीच्या सुमारास ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स देत असतात. दरम्यान Amazon या ई-कॉमर्स कंपनीनं मराठमोळ्या ग्राहकांच्या सोयीसाठी आता मराठीतही शॉपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचसोबत आता विक्रेत्यांनाही मराठीत व्यवहार करता येणार आहेत. मार्केटप्लेसमध्ये आता विक्रेत्यांना मराठी, मल्याळम, तेलुगु आणि बंगाली या भाषांमध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे, तसंच त्यांचा व्यवहार पाहता येणार आहे. 

आगामी सणासुदीच्या कालावधीकडे पाहता हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ज्याच्या मदतीनं अनेक विक्रेते, संभाव्य विक्रेते आणि नव्या विक्रेत्यांना आपला व्यवहार सुरू ठेवण्यासाठी निरनिराळ्या स्तरांच्या बाजारातून लाभ मिळेल. तसेच ते आपल्याला हव्या असलेल्या भाषेतूनही काम करू शकतील, असं Amazon नं एका निवेदनाद्वारे म्हटलं आहे.

८ भाषांत व्यवसाय करण्याची संधी
Amazon आता आपल्या ग्राहकांना आणि विक्रेत्यांना मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड, मल्याळम, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांमध्ये ऑनलाइन विक्री करण्याची आणि खरेदी करण्याची संधी देत आहे. या भाषांचा वापर करून पहिल्यांदा विक्रेता अॅमेझॉनच्या विक्रेत्याच्या रूपात रजिस्ट्रेशन करून ऑर्डर मॅनेज करण्यापर्यंतची कामं करू शकतात. अॅमेझॉनशी सद्यस्थितीत साडेआठ लाख विक्रेते जोडले गेले आहेत.

Web Title: amazon launches service in marathi tamil telugu malyalam regional language festive season shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.