Join us  

Amazon Pay ची कमाल, १० पद्धतीने करा व्यवहार; ‘हे’ पर्याय माहिती आहेत का? सोपे झाले काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 5:49 PM

Amazon Pay युझर्सना १० प्रकारचे विविध पर्याय देते. ज्यामुळे त्यांना व्यवहार करणे सोपे जाऊ शकते.

Amazon Pay:केवळ भारतात नाही तर जगभरात अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स साइटचा डंका आहे. जगातील आघाडीच्या देशांमध्ये अ‍ॅमेझॉन सेवा पुरवत आहे. भारताबाबत बोलायचे झाल्यास कोट्यवधी ग्राहक अ‍ॅमेझॉनवरून विविध प्रकारातील वस्तू खरेदी करताना दिसतात. अगदी मोबाइल, लॅपटॉपपासून ते घरगुती रोजच्या वापरातील वस्तूंपर्यंत अनेकविध उत्पादने अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉन पे यावर अनेक पर्याय युझर्सना उपलब्ध होतात, ज्यामुळे अ‍ॅमेझॉनवरून वस्तू खरेदी करण्याची प्रक्रिया तसेच अन्य व्यवहार सुलभ पद्धतीने केले जाऊ शकतात.

भारताने डिजिटल इंडियाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. यानंतर विविध प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन पेमेंट्सचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. यामध्ये अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्म मागे राहिला नाही. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये Amazon Pay चा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ग्राहक/युझर्स याचा अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने वापर करू शकतात. Amazon Pay युझर्सना १०  प्रकारचे विविध पर्याय देते. ज्यामुळे त्यांना व्यवहार करणे सोपे जाऊ शकते.

१. अ‍ॅमेझॉन पे - यामध्ये वॉलेटमध्ये पैसे जमा करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. यातून एखादी वस्तू खरेदी करताना, डेबिट/क्रेडिट कार्डसह अन्य पर्यायांचा वापर करून पेमेंट करण्यापेक्षा Amazon Pay च्या वॉलेटमधून पेमेंट केले जाऊ शकते. 

२. स्कॅन QR कोड - या पर्यायामधून युझरला अन्य कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पेमेंट करायचे असेल, तर फक्त QR कोड स्कॅन करून Amazon Pay द्वारे पेमेंट केले जाऊ शकते.

३. सेंड मनी/पैसे पाठवा - Amazon Pay वापरून दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवता येणे शक्य होते. व्यक्तीच्या मोबाइलनंबर, युपीआय कोड किंवा बँक खात्याच्या डिटेल्स भरून Amazon Pay द्वारे पैसे पाठवता येऊ शकतात.

४. मोबाइल रिचार्ज - Amazon Pay वापरून मोबाइल रिचार्ज करता येऊ शकते. तुमचा मोबाइल कुठल्या कंपनीचा आणि कोणत्या सर्कलचा आहे, असे काही आवश्यक तपशील भरून सहज आणि सुलभ पद्धतीने मोबाइलचे रिचार्ज करता येणे शक्य होते. 

५. बिल पेमेंट्स - Amazon Pay द्वारे केवळ मोबाइल रिचार्ज नाही, तर अन्य प्रकारची बिले भरली जाऊ शकतात. यामध्ये डीटीएच रिचार्ज, फास्टॅग, इलेक्ट्रिसिटी, गॅस सिलिंडर, क्रेडिट कार्ड, मोबाइल पोस्टपेड, इन्शुरन्स प्रिमियम, ब्रॉडबँड, पाइप गॅस, वॉटर, लोन रिपेमेंट, लँडलाइन, केबल टीव्ही अशा विविध प्रकारचे बिल पेमेंट्स केले जाऊ शकते. 

६. सबस्क्रिप्शन - Amazon Pay द्वारे डिझ्ने हॉटस्टार, झी5, मायक्रॉसॉफ्ट, सन टीव्ही, गाना, एमएक्स गोल्ड, इरोस नाऊ, यासह विविध OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेतले जाऊ शकते. त्यासाठी पेमेंट करायचा पर्याय Amazon Pay वर देण्यात आला आहे. 

७. कार अँड बाइक इन्शुरन्स - तुमच्या कार किंवा बाइकचा इन्शुरन्स संपला असेल, तर अन्य कुठेही जायची गरज नाही. आकर्षक पर्यायांसह Amazon Pay द्वारे कार अँड बाइक इन्शुरन्स पर्याय वापरला जाऊ शकतो. 

८. गिफ्ट कार्ड - तुमच्या प्रियजनांना एखाद्या खास क्षणांसाठी किंवा समारंभासाठी गिफ्ट द्यायची इच्छा असेल तर Amazon Pay  वापरले जाऊ शकतो. या ठिकाणी विविध कंपन्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याचा वापर युझर्स करू शकतात.

९. अ‍ॅड मनी - Amazon Pay द्वारे अ‍ॅड मनी पर्यायाचा वापर करून बँकेचा तपशील भरून यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात. वरील पर्यायांच्या पेमेंट्ससाठी अ‍ॅड मनी येथे जमा केलेले पैसे वापरले जाऊ शकतात.

१०. रिवॉर्ड्स - Amazon Pay द्वारे पेमेंट्सवर केल्यावर अ‍ॅमेझॉन तुम्हाला अनेक प्रकारचे रिवॉर्ड्स देते. याचा वापर करून तुम्ही एखाद्या प्रॉडक्ट किंवा अन्य ठिकाणी मूळ किमतीत सवलत मिळवू शकता.

#AbHarDinHuaAasan असे हजारो युझर्स म्हणत आहेत आणि आता तुम्हीही म्हणाल...