नवी दिल्ली : ई-कॉमर्स दिग्गज अॅमेझॉन इंडियाने (Amazon India) बहुप्रतिक्षित 'अॅमेझॉन प्राइम डे 2021' च्या (Amazon Prime Day 2021) तारखांची घोषणा केली आहे. या दोन दिवसांच्या सेलदरम्यान अॅमेझॉन प्राइम भारतात आपली पाच वर्षे साजरी करणार आहे. विविध कॅटॅगरीजमध्ये हजारो प्रोडक्ट्सवर सूट आणि आकर्षक ऑफर असणार आहेत. म्हणजेच, जर तुम्हाला स्वस्तात खरेदी करायचे असेल तर आतापासूनच लिस्ट तयार करा. चला तर जाणून घेऊया, या सेलबद्दल अधिक माहिती....
26 जुलैपासून होणार सुरूवात26 जुलै रोजी मध्यरात्री या सेलचे आयोजन सुरू होईल आणि 27 जुलैपर्यंत असणार आहे. अॅमेझॉनच्या प्राइम प्रोग्राममध्ये 200 मिलियन ग्राहकांचा समावेश आहे, ज्यामध्ये भारतासह इतर देशांमधील आहेत. अॅमेझॉन इंडिया केवळ आपल्या प्राइम ग्राहकांसाठी डील आणणार नाही तर छोट्या उद्योगांनाही सपोर्ट करेल.
आंतरराष्ट्रीय मेगा-रिटेलर प्राइम ग्राहकांना अॅमेझॉन, लाँचपॅड, सहेली आणि कारीगर या स्थानिक दुकानांसारख्या कार्यक्रमांतर्गत स्थानिक विक्रेते व उत्पादकांकडून उत्पादने शोधण्यात मदत करण्यासाठी खास डिल्स जारी करेल.
अनेक प्रोडक्ट्सवर मोठी सवलतकंपनीच्या म्हणण्यानुसार, या वेळी प्राइम डे सेलमध्ये ग्राहकांसाठी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, अप्लायन्स, अॅमेझॉन डिव्हाइस, फॅशन अँड ब्युटी, होम अँड किचन, फर्निचर, एव्हरेडी एसेन्शियल्स आणि बर्याच वस्तू असतील. यामध्ये अनेक प्रोडक्ट्सवर मोठी सवलत दिली जाणार आहे.