रिलायन्स जिओच्या एन्ट्रीनंतर दूरसंचार क्षेत्रातील सर्वच कंपन्यांचे धाबे दणणाले होते. अगदी तसंच रिलायन्स जिओ ओटीटीमध्येही करू पाहत असल्याचं दिसत आहे. ग्राहकांना नुकतेच झालेले आयपीएलचे सामने जिओ सिनेमावर मोफत उबलब्ध करून देण्यात आले होते. दरम्यान, आता जिओ सिनेमाला टक्कर देण्यासाठी अॅमेझॉननं आता कंबर कसली आहे.
अॅमेझॉननं आता अॅमेझॉन प्राईम लाईट सबस्क्रिप्शन लाँच केलं आहे. दरम्यान, या प्लॅनची किंमत रेग्युलर अॅमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शनपेक्षा कमी आहे. याची स्पर्धा जिओ सिनेमाशी होणार आहे. काही दिवसांपूर्वी जिओ सिनेमाचा ९९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन लाँच करण्यात आला. अॅमेझॉन प्राईम लाईट (Amazon Prime Lite) हा वार्षित प्लॅन आहे. याची किंमतही ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
कोणते मिळणार फायदे?
- अॅमेझॉन प्राइम लाइटमध्ये फास्ट डिलिव्हरी सेवा उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये एक किंवा दोन दिवसांत डिलिव्हरीचा पर्याय मिळतो. Amazon Prime च्या नियमित प्लॅनप्रमाणे Amazon Prime Lite देखील Amazon Music आणि Video सबस्क्रिप्शन ऑफर करते.
- परंतु दोन्ही प्लॅनमध्ये स्ट्रीमिंग क्वालिटीमध्ये फरक दिसून येतो. प्राईम लाईटमध्ये दोन डिव्हाईसवर अनलिमिटेड एचडी व्हिडीओची सुविधा मिळते.
- तर दुसरीकडे रेग्युलर प्लॅनमध्ये 4K स्ट्रीमिंग सुविधा मिळते. यात एकावेळी तुम्हाला ६ डिव्हाईसवर स्ट्रीमिंग करता येतं. प्राईम लाईटमध्ये प्राईम रिडिंग आणि अॅमेझॉन म्युझिकचं सबस्क्रिप्शन मिळतं.