Join us  

एअरटेल वापरकर्त्यांसाठी Amazon प्राइम सबस्क्रिप्शन मोफत; Airtel या प्लॅनने रिचार्ज करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 7:15 PM

Airtel: एअरटेल वापरकर्त्यांना अनेक प्लॅनसह OTT सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

Airtel: सध्या बाजारात अनेक टेलिकॉम कंपन्या त्यांच्या प्लॅनमध्ये ओटीटी प्राइमचे सबस्क्रिप्शन देत आहेत. पण, प्रत्येक कंपन्यांचे प्लॅन वेगळे आहेत. तुमच्याकडे एअरटेल सिम असेल तर तुम्हाला अनेक OTT चे सबस्क्रिप्शन मोफत मिळू शकते. कंपनी अशा अनेक योजना ऑफर करत आहे, याद्वारे रिचार्जवर, ओटीटी प्लॅटफॉम पैसे न देता मिळत आहे.

मुंबईच्या झोपडपट्टीत राहिले, खर्च भागवण्यासाठी पुस्तके अन् राख्या विकल्या; आज दुबईतील श्रीमंतांच्या यादीत

आपण नेहमी कॉलिंग आणि डेटा यासारख्या गरजांसाठी रिचार्ज करतो. या प्लॅनमध्ये OTT सेवेचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे, त्या प्लॅनमधून रिचार्ज केल्यास चांगले होईल. याशिवाय पात्र ग्राहकांना या प्लॅन्सचा रिचार्ज करताना अनलिमिटेड डेटाचा लाभ दिला जात आहे. यासाठी एअरटेलची 5G सेवा त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध असायला हवी आणि वापरकर्त्यांकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.

एअरटेलचे ग्राहक ८३८ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज केल्यास त्यांना ५६ दिवसांची मुदत मिळते. याशिवाय 3GB डेली डेटासह दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय दिला जात आहे. वापरकर्ते सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. Amazon प्राइम मेंबरशिप व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना Apollo 24/7 सर्कल आणि मोफत HelloTunes मिळतात.

जर तुम्हाला अधिक वैधता हवी असेल तर तुम्ही या प्लॅनसह ८४ दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज करू शकता. यासोबत रिचार्ज केल्यावर, तुम्हाला 2.5GB महिन्याचा डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच ग्राहक दररोज १०० एसएमएस पाठवू शकतात. Amazon प्राइम सदस्यत्वाव्यतिरिक्त  तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा, RewardsMini सबस्क्रिप्शन, मोफत HelloTunes आणि Apollo 24/7 सर्कल सबस्क्रिप्शन मिळते.

दोन्ही प्रीपेड योजनांसह, वापरकर्त्यांना Airtel Xstream Play Premium चे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे, यामध्ये २२ पेक्षा जास्त OTT सेवांमधील कंटेन्ट पाहिला जाऊ शकतो. यात SonyLIV, Lionsgate Play, Aha, Chaupal, Hoichoi आणि SunNxt इत्यादींचा समावेश आहे.

टॅग्स :एअरटेल