Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका वर्षासाठी Amazon Prime Video फ्री, या प्लॅनमध्ये Netflix ही; स्वस्तात ऑल इन वन प्लॅन

एका वर्षासाठी Amazon Prime Video फ्री, या प्लॅनमध्ये Netflix ही; स्वस्तात ऑल इन वन प्लॅन

सबस्क्रिप्शन प्लॅन न घेता तुम्ही Amazon Prime Video वर वेब सीरीज आणि चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 04:39 PM2023-05-03T16:39:22+5:302023-05-03T16:40:18+5:30

सबस्क्रिप्शन प्लॅन न घेता तुम्ही Amazon Prime Video वर वेब सीरीज आणि चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.

Amazon Prime Video free for one year Netflix included in this plan reliance jio cheapest 699 rs plan details | एका वर्षासाठी Amazon Prime Video फ्री, या प्लॅनमध्ये Netflix ही; स्वस्तात ऑल इन वन प्लॅन

एका वर्षासाठी Amazon Prime Video फ्री, या प्लॅनमध्ये Netflix ही; स्वस्तात ऑल इन वन प्लॅन

ॲमेझॉन प्राईम व्हिडीओचा (Amazon Prime Video) वार्षिक प्लॅन १४९९ रुपयांचा आहे, पण जर तुम्हाला १५०० रुपये खर्च करायचे नसतील, तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सबस्क्रिप्शन प्लॅन न घेता तुम्ही Amazon Prime Video वर वेब सीरीज आणि चित्रपटांचा आनंद कसा घेऊ शकता. तसंच, जर तुम्ही रिलायन्स जिओचे युझर असाल, तर आम्ही तुम्हाला कंपनीकडे उपलब्ध असलेल्या एका उत्तम प्लॅनबद्दल माहिती देत आहोत.

रिलायन्स जिओच्या या ६९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला १०० जीबी डेटा ऑफर केला जातो. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जर तुम्ही राहत असलेल्या परिसरात रिलायन्स जिओची 5G सेवा आली असेल, तर तुम्हाला या प्लॅनसह कंपनीकडून 5G डेटा मिळेल. कंपनी अमर्यादित 5G हाय स्पीड डेटा ऑफर करेल.

जर तुम्ही डेटा लिमिटचा पूर्णपणे वापर केला तर त्यानंतर कंपनी तुमच्याकडून अतिरिक्त डेटासाठी प्रति जीबी १० रुपये आकारेल. प्रीपेड प्रमाणे, जिओच्या या पोस्टपेड प्लॅनसह, तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभ देखील दिला जाईल. याशिवाय तुम्हाला या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील दिले जातील. इतकंच नाही तर ६९९ रुपयांच्या या प्लॅनमधून तुम्ही ३ अॅड ऑन फॅमिली सिम्स देखील घेऊ शकता आणि प्रत्येक सिमसोबत तुम्हाला दरमहा अतिरिक्त 5G डेटा देखील दिला जाईल.

नेटफ्लिक्सही मिळणार
इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचं झाल्यास, रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला १ वर्षासाठी ॲमेझॉन प्राईम व्हिडीओचं (Amazon Prime Video)  सबस्क्रिप्शन मिळेल. नेटफ्लिक्सबद्दल बोलायचं झाले तर, या प्लॅनसह तुम्हाला नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन मिळेल. तसंच फ्री ट्रायलनंतर प्रत्येक ॲड ऑन फॅमिली सिमसाठी दरमहा ९९ रुपये आकारले जातील. याशिवाय, कंपनी ॲक्टिव्हेशनच्या वेळी प्रत्येक सिमसाठी ९९ रुपये प्रोसेसिंग शुल्क देखील आकारेल.

Web Title: Amazon Prime Video free for one year Netflix included in this plan reliance jio cheapest 699 rs plan details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.