Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel चा ग्राहकांना ‘जोर का झटका’, या मोफत सेवेत झाला मोठा बदल

Airtel चा ग्राहकांना ‘जोर का झटका’, या मोफत सेवेत झाला मोठा बदल

कंपनीनं नुकताच यात मोठा बदल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:12 PM2022-04-18T23:12:08+5:302022-04-18T23:12:52+5:30

कंपनीनं नुकताच यात मोठा बदल केला आहे.

amazon prime video free service offered in airtel plans now come 6 moths validity disney plus hotstar unlimited calling data | Airtel चा ग्राहकांना ‘जोर का झटका’, या मोफत सेवेत झाला मोठा बदल

Airtel चा ग्राहकांना ‘जोर का झटका’, या मोफत सेवेत झाला मोठा बदल

एअरटेलने (Airtel) यूजर्सना मोठा झटका दिला असून याचा यूजर्सच्या एन्टरटेन्मेंटवर मोठा परिणाम होऊ शकतो. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार कंपनीने पोस्टपेड प्लॅनसह उपलब्ध असलेल्या Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन एका वर्षावरून 6 महिन्यांपर्यंत कमी केले आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी र्एकूण 5 पोस्टपेड प्लॅन ऑफर करते आणि यापैकी चार प्लॅन अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शनसह येतात.

कंपनीच्या ज्या प्लॅनमध्ये Amazon Prime Video चे 6 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे त्यात 499 रुपये, 999 रुपये, 1199 रुपये आणि 1599 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. कंपनीने या प्लॅन्समध्ये उपलब्ध असलेल्या प्राइम व्हिडिओच्या सबस्क्रिप्शनमध्ये बदल केले आहेत. परंतु या सर्व प्लॅन्समध्ये ग्राहकांना एक वर्षासाठी Disney + Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

काय मिळतायत बेनिफिट्स
चारही पोस्टपेड प्लॅनमध्ये, कंपनी देशातील सर्व नेटवर्कवर दररोज 100 मोफत एसएमएससह अमर्यादित कॉलिंग ऑफर करत आहे. याशिवाय Amazon Prime Video सोबत या सर्व प्लॅन्समध्ये Airtel Extreme आणि Disney + Hotstar चे मोफत सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

1599 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना Netflix चा अॅक्सेसही देण्यात येत आहे. याशिवाय 1599 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 ISD मिनिटेही देण्यात येतात. कंपनी या प्लॅन्समध्ये इंटरनेट वापरासाठी 75 GB ते 250 GB पर्यंत डेटा देत आहे. या प्लॅन्सचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे नियमित कनेक्शनसोबत मोफत अॅड-ऑन कनेक्शनही उपलब्ध आहेत.

Web Title: amazon prime video free service offered in airtel plans now come 6 moths validity disney plus hotstar unlimited calling data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.