Lokmat Money > बिझनेस न्यूज > सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?

सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?

जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिलेल्या आदेशानंतर अ‍ॅमेझॉनला एका महिलेला तिच्या खात्यातून कापलेले पैसे परत करावे लागणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 10:18 AM2024-10-14T10:18:28+5:302024-10-14T10:19:44+5:30

जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिलेल्या आदेशानंतर अ‍ॅमेझॉनला एका महिलेला तिच्या खात्यातून कापलेले पैसे परत करावे लागणार आहेत.

Amazon Retail India fined Rs 40325 in phone hacking case in Chandigarh | सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?

सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?

Amazon Retail India : गेल्या काही काळापासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. सरकारकडून या फसवणुकीला बळी पडू नये म्हणून सातत्याने नागरिकांना जागरुक केलं जात आहे. तरीही काही जण या फसवणुकीमध्ये अडकून आर्थिक नुकसान करुन घेत आहेत. मात्र काही सजग नागरिक फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच सतर्क होत आहे. अशातच चंदीगडमध्ये एका महिलेला अ‍ॅमेझॉनच्या चुकीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर महिलेला तिचे पैसे परत मिळणार आहेत.

जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने ॲमेझॉन रिटेल इंडियाला एका महिलेला जबरदस्ती वस्तूंची विक्री केल्याबद्दल पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. महिलेचा मोबाईल हॅक करुन तिचा डेटा चोरण्यात आला होता. त्यानंतर महिलेच्या नावावर ॲमेझॉनवरुन खरेदी देखील करण्यात आली. त्यानंतर महिलेच्या खात्यातून अचानक पैसे कापले गेले. महिलेच्या हे सगळं लक्षात आल्यानंतर तिने या प्रकरणाची तक्रार नोंदवली होती. आता जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने या प्रकरणात महिलेच्या बाजूने निकाल देत व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत.

चंदीगडच्या पीजीआय वसतिगृहातील रहिवासी समिता दास (४७) यांचा फोन हॅक करून त्यांचा ईमेल आयडी आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरल्यानंतर हॅकर्सनी ॲमेझॉनवर अनेक ऑनलाइन ऑर्डर दिल्या होत्या. समिता यांना या घटनेची माहिती मिळताच तिने तातडीने सर्व ऑर्डर रद्द केल्या. असे असूनही, अ‍ॅमेझॉनने कोणतीही पडताळणी न करता काही ऑर्डर स्वीकारल्या, ज्यामुळे समिताच्या खात्यातून तब्बल ४० हजार रुपये कापले गेले. हे प्रकरणजिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे गेल्यानंतर अ‍ॅमेझॉनला व्याजासह भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची सुनावणी करताना, जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने ॲमेझॉनला ४०,३२५ रुपयांचा परतावा ९% व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच ॲमेझॉनला मानसिक त्रास आणि न्यायालयीन खर्चासाठी १८ हजार रुपयांची भरपाई देण्यासही सांगण्यात आले आहे. आयोगासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान समिता दास यांनी सांगितले की, तिचा मोबाइल फोन हॅक झाला होता.

नेमकं प्रकरण काय?

समिता दास यांनी आयोगासमोर दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं की, "१९ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांचा मोबाईल फोन हॅक करुन ईमेल आयडी आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरण्यात आली होती. याचा वापर करून हॅकर्सनी समिताच्या ॲमेझॉन अकाउंटवरून अनेक ऑनलाइन ऑर्डर्स दिल्या होत्या. मला याबद्दल कळालं तेव्हा या सगळ्या ऑर्डर रद्द करुन ॲमेझॉनला ईमेलद्वारे या सगळ्याची माहिती दिली. मात्र तरीही माझ्या खात्यातून ४०,३२५ रुपये कापले गेले. यानंतर मी  कंपनीकडे अनेक वेळा पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२३ रोजी कायदेशीर नोटीस पाठवली, त्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही." 

यानंतर समिताने जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. आयोगाने सुनावणीदरम्यान सांगितले की, "तक्रारदार समिताने ॲमेझॉनला सांगितले होते की तिचे खाते हॅक झाले होते आणि अनेक ऑर्डर रद्द करण्यात आल्या होत्या. तरीही, ऑर्डर रद्द न करता त्या देण्यात आल्या आणि त्यासाठी पैसे कापण्यात. त्यामुळे ग्राहकाला मानसिक तणाव व त्रासाला सामोरे जावे लागले, यावरून कंपनीची ग्राहकाप्रती असलेली उदासीनता दिसून येते. कंपनीने या प्रकरणाची चुकीच्या पद्धतीने हाताळणी केली. तसेच तक्रारीवर त्वरित कारवाई करण्यास विलंब केला आणि तक्रारदाराच्या वारंवार विनंतीकडे दुर्लक्ष केले."

Web Title: Amazon Retail India fined Rs 40325 in phone hacking case in Chandigarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.