नवी दिल्ली : अमेरिकेतील ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉननेरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि फ्यूचर समूह यांच्यातील डीलबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, अॅमेझॉनने फ्यूचर समुहाने कॉन्ट्रॅक्टच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात अॅमेझॉनने फ्यूचर समुहाच्या प्रमोर्टर्सला कायदेशीर नोटीसही पाठविली आहे.
काय आहे प्रकरण?गेल्या वर्षी अॅमेझॉनने फ्यूचरमध्ये 49 टक्के भागभांडवल सुमारे 1500 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. याव्यतिरिक्त, अॅमेझॉनची फ्यूचर रिटेलमध्ये 7.3 टक्के भागिदारी आहे. अॅमेझॉनने कायदेशीर नोटीसमध्ये असा आरोप केला आहे की, फ्यूचर समूहाने या डीलची योग्यता पूर्ण केली नाही. या वादामुळे हे प्रकरण कार्टातही जाण्याची शक्यता आहे.
रिलायन्स 24713 कोटींची डीलऑगस्ट महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (RRVL) ने फ्यूचर समुहासोबत झालेल्या डीलबाबत माहिती दिली होती. त्याअंतर्गत, कंपनी फ्यूचर समूहाचा रिटेल अँड होलसेल बिझिनेस व लॉजिस्टिक्स अँड वेअरहाउसिंग बिझिनेस घेणार आहे. यामुळे रिलायन्स फ्यूचर समूहाच्या बिग बाजार, ईजीडे आणि एफबीबीच्या 1800 हून अधिक स्टोअरपर्यंत जाईल. जे देशातील 420 शहरांध्ये पसरले आहे. 24713 कोटींमध्ये ही डील अंतिम झाली आहे.
जिओ-रिलायन्स डीलवरही प्रश्नचिन्हरिलायन्स रिटेलशी संबंधित ही बातमी अशा वेळी आली आहे. ज्यावेळी कंपनीच्या जिओ प्लॅटफॉर्म आणि फेसबुक यांच्यातील डीलबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका रिपोर्टनुसार, भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीआय) जिओ प्लॅटफॉर्म आणि फेसबुक यांच्यातील डीलबाबत डेटा शेअररिंगवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. सीसीआयने म्हटले आहे की, या कंपन्यांना एकमेकांकडून मिळणारा डेटा बाजारात प्रतिस्पर्धीविरोधी वर्तन वाढवेल. मात्र, रिलायन्सकडून डेटाचे मर्यादित विनिमय होईल, असे फेसबुकने आश्वासन दिले आहे.
रिलायन्स रिटेलमध्ये बरीच गुंतवणूकअलीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल व्यवसायासाठी आणखी एक मोठा गुंतवणूकदार मिळाला आहे. अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरण (ADIA) रिलायन्स रिटेलमध्ये 5,512.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरणचा 1.20 टक्के हिस्सा मिळणार आहे. या गुंतवणूकीमुळे रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने आतापर्यंत एकूण 37,710 कोटी रुपये जमा केले आहेत. याआधी सिल्व्हर लेक, केकेआर, जनरल अटलांटिक, मुबाडला, जीआयसी आणि टीपीजीने कंपनीत गुंतवणूकीची घोषणा केली आहे.