Join us  

Amazon चा मोठा झटका! शेकडो भारतीयांची नोकरी जाणार, धक्कादायक अहवाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 11:03 AM

कर्मचारी कपातीबाबत सुरू असलेल्या सरकारी चौकशी दरम्यान आता Amazon Jobs बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

कर्मचारी कपातीबाबत सुरू असलेल्या सरकारी चौकशी दरम्यान आता Amazon Jobs बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. नव्या अहवालानुसार अ‍ॅमेझॉन इंडियामध्ये शेकडो भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या कर्मचारी कपातीची घोषणा पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्स कंपनी देशातील आपले काही ऑपरेशन्स बंद करणार आहे. त्यामुळे देशभरातील शेकडो लोकांना नोकरी गमवावी लागणार आहे. कंपनीचे नेमके कोणकोणते विभाग बंद केले जाणार आहेत याचीही माहिती समोर आली आहे. 

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, Amazon India मध्ये जेवण डिलिव्हरीचा बिझनेस, छोट्या व्यापाऱ्यांना पॅक्ड कन्ज्युमर गुड्सची डोअरस्टेप डिलिव्हरी हे विभाग बंद करण्याचा विचार सुरू आहे. पुढील महिन्यापासून हे विभाग बंद होऊ शकतात. त्यामुळे या विभागांशी निगडीत शेकडो कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. 

अ‍ॅमेझॉन अकादमी बंद, बीटा टेस्टिंग पुढे ढकललंरिपोर्टमधील माहितीनुसार कंपनीनं भारतातील जेईई आणि नीट एक्झामची तयारी करणाऱ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म Amazon Academy देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यासाठी थोडा कालावधी जाणार आहे. अ‍ॅमेझॉनमध्ये आधीच कर्मचारी कपातीची चौकशी सुरू असताना हा धक्कादायक अहवाल आला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉनने जगभरातील आपल्या कार्यालयातून १०,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. 

आतापर्यंत कंपनीने कोणालाही कामावरून काढलं नसल्याचं सांगितलं जात आहे. उलट कर्मचाऱ्यांनाच राजीनामे देण्यास सांगितलं जात आहे. अ‍ॅमेझॉन कर्मचाऱ्यांना कंपनीच्या व्हॉलंटरी सेपरेशन प्रोग्राम (VSP) अंतर्गत राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे त्यांना अनेक फायदे होतील. जसं की २२ आठवड्यांपर्यंतचं मूळ वेतन (प्रत्येक 6 महिन्यांच्या सेवेसाठी एका आठवड्याचे मूळ वेतन), ६ महिन्यांपर्यंतचं वैद्यकीय विमा संरक्षण. ज्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्रोग्राममध्ये ठेवलं गेलं आहे ते VSP साठी साइन अप करू शकणार नाहीत.

टॅग्स :अ‍ॅमेझॉन