Join us  

मुकेश अंबानींना 'सर्वोच्च' धक्का; फ्युचरसोबतचा २५ हजार कोटींचा करार धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 1:52 PM

मुकेश अंबानींच्या 'रिटेल' स्वप्नांना मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयातील खटला ऍमेझॉननं जिंकला

नवी दिल्ली: उद्योगपती मुकेश अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्युचर समूह यांच्यातला २४ हजार ७३१ कोटी रुपयांचा करार धोक्यात सापडला आहे. रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं ऍमेझॉनच्या बाजूनं निकाल दिला आहे. ऑक्टोबरमध्ये याच प्रकरणात सिंगापूरच्या मध्यस्थी न्यायालयानं दिलेल्या निकाल योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहाला मोठा धक्का बसला आहे.

ऍमेझॉन आणि किशोर बियाणींच्या फ्यूचर समूहात कायदेशीर लढा सुरू होता. सिंगापूरच्या न्यायालयानं दिलेला आदेश भारतात लागू करावा यासाठी ऍमेझॉननं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. हा निकाल ऍमेझॉनच्या बाजूनं आल्यानं फ्यूचर समूहाच्या अडचणी वाढल्या आहेत. फ्यूचरनं रिलायन्ससोबत करार केला होता. त्यामुळेच याचा मोठा फटका रिलायन्सला बसणार आहे.

नेमकं प्रकरण काय?गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये फ्यूचर समूहानं फ्यूचर रिटेलसह आपल्या ५ लिस्टेड कंपन्यांचं फ्यूचर एंटरप्रायझेसस लिमिटेडमध्ये विलनीकरण करण्याची घोषणा केली. यानंतर फ्यूचर समूह त्यांचा रिटेल व्यवसाय रिलायन्सला हस्तांतरित करणार होता. हा करार जवळपास २५ हजार कोटी रुपयांचा आहे.

ऍमेझॉनची न्यायालयात धावऍमेझॉनचा फ्यूचर समूहात ५ टक्के वाटा आहे. २०१९ मध्ये ऍमेझॉननं फ्यूचर कूपंसमध्ये ४९ टक्के वाटा विकत घेतला. यासाठी ऍमेझॉननं १५०० कोटी रुपये मोजले. आपल्या परवानगीशिवाय फ्यूचर समूहानं आपला व्यवसाय रिलायन्सला विकल्याचा आक्षेप ऍमेझॉननं नोंदवला. या प्रकरणी ऍमेझॉननं सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटरमध्ये याचिका दाखल केली होती.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सअ‍ॅमेझॉन