Lokmat Money > बिझनेस न्यूज > अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलचा उद्या प्रारंभ; दररोज वेगवेगळ्या ऑफर्स अन् सवलत मिळणार

अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलचा उद्या प्रारंभ; दररोज वेगवेगळ्या ऑफर्स अन् सवलत मिळणार

Amazon Sale: याशिवाय ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 04:32 AM2020-10-16T04:32:18+5:302020-10-16T04:32:28+5:30

Amazon Sale: याशिवाय ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे

Amazon's Great Indian Festival kicks off tomorrow; You will get different offers and discounts every day | अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलचा उद्या प्रारंभ; दररोज वेगवेगळ्या ऑफर्स अन् सवलत मिळणार

अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलचा उद्या प्रारंभ; दररोज वेगवेगळ्या ऑफर्स अन् सवलत मिळणार

बंगळुरू : अमेझॉनतर्फे शनिवार, दि. १७ पासून अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलला प्रारंभ होत आहे. त्यामध्ये विविध कंपन्यांच्या वेगवेगळ्या मोबाइल फोनमधून ग्राहकांना निवडीची संधी उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्ससाठी एक दिवस आधीपासून (दि. १६) फेस्टिव्हलला प्रारंभ होणार आहे.

या फेस्टिव्हलमध्ये सॅमसंग, वन प्लस, अ‍ॅपल, ओप्पो यांसारख्या आघाडीच्या मोबाइल कंपन्या नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे सध्याचे फोनही उपलब्ध आहेत. दररोज वेगवेगळ्या ऑफर्स आणि सवलत मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काही ब्रॅण्ड्सवर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध होणार आहे.

याशिवाय ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय अ‍ॅमेझॉन पे यूपीआय, अ‍ॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड यांचा वापर केल्यास दररोज ५०० रुपयांपर्यंत शॉपिंग रिवॉर्ड जिंकण्याची संधी उपलब्ध असणार आहे. अ‍ॅमेझॉन पे लेटर आणि अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड यांचा वापर केल्यास नंतर पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये वनप्लसचा ८टी, सॅमसंगचा गॅलेक्सी एम३१, प्राइम, गॅलेक्सी एस २०, ओप्पोचा ए १५ हे नवीन मोबाइल लाँच केले जाणार आहेत. 

Web Title: Amazon's Great Indian Festival kicks off tomorrow; You will get different offers and discounts every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.