Join us  

अमेझॉनची 'मेगा भरती', या महिन्यातच 50,000 जागांसाठीची प्रकिया सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 7:37 PM

जैसी यांनी आपल्या पहिल्याच मुलाखतीत मोठी घोषणा केली. रिटेल, क्लाउड आणि जाहिराती विभागातील मागणीसह इतरही व्यवसायांसाठी ही मेगा भरती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोरोना महामारीमुळे नोकरीच्या व्याख्येत बदल झाला आहे, अनेकांनी आपली नोकरीही गमावली आहे. त्यामुळे, अनेकजण नवीन नोकरीच्या शोधात असून हा बदल ते स्विकारण्यास इच्छुक आहेत, असे अमेरिकेतील एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मुंबई - ऑनलाईन शॉपिंग अॅमेझॉन मेगा भरती करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे नवीन चीफ एक्झुक्युटीव्ह एँडी जैसी यानी माहिती देताना अॅमेझॉनमध्ये मोठी नोकर भरती करण्यात येणार असल्याचं सांगितलं. आगामी काही महिन्यांत जागतिक स्तरावर कॉर्पोरेट आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित कामासाठी तब्बल 55 हजार लोकांना नोकरी उबलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. जुलै महिन्यातच जैसी यांनी सीईओ पदाचा कार्यभार स्विकारला आहे. 

जैसी यांनी आपल्या पहिल्याच मुलाखतीत मोठी घोषणा केली. रिटेल, क्लाउड आणि जाहिराती विभागातील मागणीसह इतरही व्यवसायांसाठी ही मेगा भरती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कंपनीच्या कुईपर या नवीन प्रोजेक्टसाठीही उमेदवार हवे आहेत. अमेझॉन या प्रोजेक्स्टच्या माध्यमातून ब्रॉडबँडपर्यंत सेवा जलद होण्यासाठी आकाशात ऑर्बिटच्या कक्षेत सॅटेलाईट सोडणार आहे. अमेझॉनचे वार्षिक नोकरी मेळावा 15 सप्टेंबरपासून सुरू होईल. त्यामध्ये, अपक्षेप्रमाणे भरती करण्यात येईल, असेही जैसी यांनी मुलाखतीत सांगितले. 

कोरोना महामारीमुळे नोकरीच्या व्याख्येत बदल झाला आहे, अनेकांनी आपली नोकरीही गमावली आहे. त्यामुळे, अनेकजण नवीन नोकरीच्या शोधात असून हा बदल ते स्विकारण्यास इच्छुक आहेत, असे अमेरिकेतील एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. अमेझॉन कार्पोरेट आणि टेक्नॉलॉजी स्टाफच्या संख्येत 20 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर जवळपास 2,75000 एवढी ही संख्या आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊनच कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरुप ठरवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :अ‍ॅमेझॉननोकरीअमेरिकाव्यवसाय