ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 28 - दहा वर्षांपूर्वी वेगळे झालेले अंबानी बंधूंनी हातमिळवणी केली आहे. वडील धीरुभाई अंबानी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रियायन्स कम्युनिकेशनचे अनिल अंबानी आणि रिलायन्स जिओचे मुकेश अंबानी एकत्र आले आहेत. अनिल अंबानी यांनी यांसदर्भातील माहिती रिलायन्स ग्रुपवर ट्विट करुन दिली आहे.
अर्थात ही हातमिळवणी व्हर्च्युअल पातळीवरची आहे. अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन आणि मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ या दोन्ही कंपन्या यापुढे त्यांचे टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर वाटून घेणार आहेत. यामुळे रिलायन्सच्या ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधांचा लाभ होईल.
टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रियालन्स कम्युनिकेशनचे मोबाईल टॉवर्स, ऑप्टीकल फायबर नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि रिलायन्स जिओच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि फोर जी एलटीई सेवा एकत्रित काम करतील, अशी माहिती अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या शेअर होल्डर्सना मंगळवारी दिली आहे.