Lokmat Money > बिझनेस न्यूज > Anant Ambani-Radhika Engagement: अंबानींच्या 'टफी'ने आणली स्पेशल वस्तू, सरप्राइज एन्ट्रीने सगळेच चकित

Anant Ambani-Radhika Engagement: अंबानींच्या 'टफी'ने आणली स्पेशल वस्तू, सरप्राइज एन्ट्रीने सगळेच चकित

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यात लक्ष वेधलं ते 'टफी' ने. बघा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 02:01 PM2023-01-20T14:01:04+5:302023-01-20T14:02:50+5:30

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यात लक्ष वेधलं ते 'टफी' ने. बघा व्हिडिओ

ambani family dog was the ring bearer in engagement ceremony of anant ambani and radhika merchant | Anant Ambani-Radhika Engagement: अंबानींच्या 'टफी'ने आणली स्पेशल वस्तू, सरप्राइज एन्ट्रीने सगळेच चकित

Anant Ambani-Radhika Engagement: अंबानींच्या 'टफी'ने आणली स्पेशल वस्तू, सरप्राइज एन्ट्रीने सगळेच चकित

Anant Ambani-Radhika Engagement : देशातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानीने (Isha Ambani) जुळ्या मुलांना जन्म दिला. तर आता नुकताच अंबानींच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. कालच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा अॅंटिलिया (Antilia) या निवासस्थानी थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी एका गोष्टीने सगळ्यांचेच लक्ष वेधले. रिंग सेरेमनी साठी चक्क अंबानींचा पाळीव कुत्रा अंगठी घेऊन आला.हा कुत्रा या शाहीसोहळ्यात रिंग बेअरर होता. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि खूप पसंत केला जातोय.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यावेळी रिंग सेरेमनीसाठी ईशा अंबानी आधी स्टेजवर आल्या. त्यांनी माईकवर सांगितले, या रिंग सेरेमनीसाठी आता एक स्पेशल रिंग बेअरर (Ring Bearer) येत आहे. असं म्हणताच या क्युट कुत्र्याची एंट्री होते आणि सगळ्यांचंच लक्ष त्यांच्याकडे वळते. 

हा कुत्रा अंबानी कुटुंबातीलच असून अनंत अंबानींचा अगदी लाडका आहे. स्टेजवर येताच अनंत अंबानी त्याचे लाड करतात हे सुद्धा व्हिडिओमध्ये दिसून येतंय. एवढ्या खास क्षणी पाळीव कुत्र्याला हा मोठा मान दिल्याबद्दल अंबांनी कुटुंबाचे कौतुकच होता आहे. यानंतर सर्व कुटुंब एकत्र नाचतानाही व्हिडिओमध्ये दिसते. 



नीता आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत, यूएसए मधील ब्राउन युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि तेव्हापासून रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये  जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डाचे सदस्य म्हणून विविध पदांवर काम केले आहे. सध्या ते आरआयएल च्या ऊर्जा व्यवसायाचे नेतृत्व करतात. शैला आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका, न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवीधर आहे आणि एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.

Web Title: ambani family dog was the ring bearer in engagement ceremony of anant ambani and radhika merchant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.