Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंबानी कुटुंबाची नव्या उद्योगात एन्ट्री, आकाश धुरा सांभाळणार; बजाज, HDFC चं टेन्शन वाढणार!

अंबानी कुटुंबाची नव्या उद्योगात एन्ट्री, आकाश धुरा सांभाळणार; बजाज, HDFC चं टेन्शन वाढणार!

बजाज, एचडीएफसी आणि इतर बँकांसह आपल्याला जिओ फायनान्सचेही एक ऑप्शन मिळेल. यामुळे जिओच्या एन्ट्रीने या बँका आणि फायनान्स कंपन्यांसमोरील आव्हान वाढेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 05:12 PM2023-06-29T17:12:40+5:302023-06-29T17:13:49+5:30

बजाज, एचडीएफसी आणि इतर बँकांसह आपल्याला जिओ फायनान्सचेही एक ऑप्शन मिळेल. यामुळे जिओच्या एन्ट्रीने या बँका आणि फायनान्स कंपन्यांसमोरील आव्हान वाढेल.

Ambani family's entry into a new industry, Akash will take the responsibility; Bajaj, HDFC tension will increase | अंबानी कुटुंबाची नव्या उद्योगात एन्ट्री, आकाश धुरा सांभाळणार; बजाज, HDFC चं टेन्शन वाढणार!

अंबानी कुटुंबाची नव्या उद्योगात एन्ट्री, आकाश धुरा सांभाळणार; बजाज, HDFC चं टेन्शन वाढणार!

भारतातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आपल्या मुलांना व्यवसाय क्षेत्रात पुढे नेत आहेत. आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी हे तिघेही रिलायन्स समूहाचे वेगवेगळे व्यवसाय सांभाळत आहेत. आकाशकडे जिओची जबाबदारी आहे. आता आकाश आणखी एका नव्या व्यवसायात उतर आहे. आकाश अंबानीच्या नेतृत्वाखालील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने कंझ्यूमर फायनान्स प्रोग्रॅम लॉन्च केला आहे. Jio NBFC चे ट्रायलही सुरू झाले आहे. आता यामुळे बजाज आणि एचडीएफसीचे टेंशन वाढूशकते.

नव्या उद्योगात एन्ट्री -
पायलट प्रोजेक्ट म्हणून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस Jio NBFC ची सर्व्हिस रिलायन्स डिजिटलच्या काही निवडक आउटलेट्सवर सुरू करण्यात आली आहे. इकोनॉमिक टाइम्स हिंदीच्या एका वृत्तानुसार, रिलायन्स जिओ सध्या या प्रोजेक्टचे ट्रायल करत आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत जिओ फायनान्शियल सर्विसेसची सुरुवात होऊ शकते. यानंतर, जियो फायनान्सच्या मदतीने रिलायन्स डिजिटलच्या स्टोअरवरून कुठलीही इलेक्ट्रॉनिक्स अथवा इलेक्ट्रिकल वस्तूंची खरेदी केल्यानंतर, ग्राहकांना मासिक EMI द्वारे रक्कम चुकवण्यासाठी ऑफर मिळू शकते. 

एचडीएफसी, बजाज सारख्या फायनान्स कंपन्यांना आव्हान -
रिलायन्स डिजिटल स्टोरवर बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँक आदिच्या ईएमआय सुविधाही मिळत आहेत. यातच आता Jio NBFC नेही एंट्री केली आहे. रिलायन्स डिजिटलच्या अनेक आउटलेटवर जिओ फायनान्सचे ऑप्शन दिसत आहे. याच्या मदतीने इलेक्ट्रिकल्स प्रोडक्ट्सची खरेदी करून आपण ईएमआयचा ऑप्शन निवडू शकता. बजाज, एचडीएफसी आणि इतर बँकांसह आपल्याला जिओ फायनान्सचेही एक ऑप्शन मिळेल. यामुळे जिओच्या एन्ट्रीने या बँका आणि फायनान्स कंपन्यांसमोरील आव्हान वाढेल.
 

Web Title: Ambani family's entry into a new industry, Akash will take the responsibility; Bajaj, HDFC tension will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.