Lokmat Money > बिझनेस न्यूज > ही बर्बाद कंपनी खरेदी करण्याच्या रेसमध्ये अंबानी; बातमी येताच 80 पैशांच्या शेअरनं घेतली भरारी!

ही बर्बाद कंपनी खरेदी करण्याच्या रेसमध्ये अंबानी; बातमी येताच 80 पैशांच्या शेअरनं घेतली भरारी!

संबंधित कंपनीच्या खरेदीसाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलसह 3 कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 04:49 PM2023-07-12T16:49:36+5:302023-07-12T16:50:44+5:30

संबंधित कंपनीच्या खरेदीसाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलसह 3 कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे.

Ambani in race to buy the future enterprises company; As soon as the news came, the shares of 80 paise become rocket | ही बर्बाद कंपनी खरेदी करण्याच्या रेसमध्ये अंबानी; बातमी येताच 80 पैशांच्या शेअरनं घेतली भरारी!

ही बर्बाद कंपनी खरेदी करण्याच्या रेसमध्ये अंबानी; बातमी येताच 80 पैशांच्या शेअरनं घेतली भरारी!

फ्यूचर शमूहाची दिवाळखोर कंपनी फ्यूचर एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त तेजी बघायला मिळाली. आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी या शेअरमध्ये जवळपास 7 टक्क्यांची तेजी आली आहे. या शेअरचा भाव आता 81 पैशांवर पोहोचला आहे. शेअरमध्ये ही तेजी कंपनीशी संबंधित एका बातमी नंतर आली आहे. महत्वाचे म्हणजे, फ्यूचर एंटरप्रायजेसच्या खरेदीसाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलसह 3 कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. रिलायन्स रिटेल, ही रिलायन्स इंडस्ट्रीजची सब्सिडरी कंपनी आहे.

या 3 कंपन्या रेसमध्ये -
फ्युचर एंटरप्रायजेसला कॉर्पोरेट दिवाळखोरी प्रक्रियेंतर्गत रिलायन्स रिटेलशिवाय जिंदल (इंडिया) लिमिटेड आणि जीबीटीएल लिमिटेडकडून रिझोल्यूशन प्लॅन प्राप्त झाले आहेत. एव्हिल मॅनेजसने या तिन्ही कंपन्यांच्या नावांचा खुलासा केला आहे. रिझोल्यूशन व्यावसायिकांनी कर्जदात्यांचे 12,265 कोटी रुपये आणि मुदत ठेव धारकांचे 23 कोटी रुपयांचे दावे स्वीकारले आहेत.

महत्वाचे म्हणजे, फ्युचर एंटरप्रायजेसकडे सेंटबँक फायनांन्शिअल सर्व्हिसेसने सर्वाधिक 3,344 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. यानंतर, अॅक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेसने 1,341 कोटी रुपये आणि विस्ट्रा आयटीसीएलने (इंडिया) 210 कोटी रुपयांचा दावा केला आहे.

गेल्या 27 फेब्रुवारीला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने किशोर बियानी यांच्या फ्युचर एंटरप्रायजेसला कॉर्पोरेट दिवाळखोर म्हणून स्वीकार केले होते. सध्या, किशोर बियाणी-प्रवर्तित फ्युचर ग्रुपच्या चार कंपन्यां दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे.. फ्युचर एंटरप्रायजेस, फ्युचर रिटेल लिमिटेड, फ्युचर लाइफस्टाइल्स फैशन लिमिटेड आणि फ्युचर सप्लाय चेन लिमिटेड, अशी या कंपन्यांची नावे आहेत.

Web Title: Ambani in race to buy the future enterprises company; As soon as the news came, the shares of 80 paise become rocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.