Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंबानींनी केली दिवाळीची मोठी खरेदी! वर्ल्ड फेमस ब्युटी बिझनेस विकत घेतला, Sephora चे प्रोडक्ट मिळणार

अंबानींनी केली दिवाळीची मोठी खरेदी! वर्ल्ड फेमस ब्युटी बिझनेस विकत घेतला, Sephora चे प्रोडक्ट मिळणार

मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूह आपला व्यवसाय सतत वाढवत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 09:55 AM2023-11-04T09:55:45+5:302023-11-04T09:59:31+5:30

मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूह आपला व्यवसाय सतत वाढवत आहे.

Ambani made a big Diwali purchase! World famous beauty business bought Sephora products will be available | अंबानींनी केली दिवाळीची मोठी खरेदी! वर्ल्ड फेमस ब्युटी बिझनेस विकत घेतला, Sephora चे प्रोडक्ट मिळणार

अंबानींनी केली दिवाळीची मोठी खरेदी! वर्ल्ड फेमस ब्युटी बिझनेस विकत घेतला, Sephora चे प्रोडक्ट मिळणार

मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) नेतृत्वाखालील रिलायन्स समूह (Reliance Group) आपला व्यवसाय सतत वाढवत आहे. समूह विविध व्यवसायांचं अधिग्रहण करून नवीन क्षेत्रातही प्रवेश करत आहे. आता रिलायन्स रिटेलनं अरविंद फॅशन्सचा (Arvind Fashions) ब्युटी व्यवसाय ताब्यात घेतला आहे. प्रसिद्ध ब्युटी प्रोडक्ट रिटेलर सेफोरानं (Sephora) रिलायन्स ब्युटी अँड पर्सनल केअर लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केलीये. 

ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या (RRVL) पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या भागीदारीमुळे रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडला भारतातील सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलवर सेफोराची उत्पादनं विकण्याचा अधिकार मिळेला. सेफोरा २०१२ पासून भारतात आपली उत्पादनं विकत आहे.

रिलायन्सच्या प्लॅटफॉर्मवर विक्री
"आम्ही आमच्या व्यवसायात बदल घडवून आणण्यासाठी भारतातील सर्वात मोठ्या समूहासोबत करार करुन उत्साहित आहोत. वाढतं शहरीकरण, सोशल मीडियातील प्रसारामुळे ब्युटी प्रोडक्ट्सबाबात आता जागरुकरता निर्माण झाली आहे. यामुळे प्रतिष्ठित ब्युटी प्रोडक्टसाठी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. आपली व्याप्ती वाढवणं आणि विशिष्ट ब्रांड्सना बाजारात आणण्यासाठी ही योग्य वेळ आहे," अशी प्रतिक्रिया सेफोराच्या आशिया प्रेसिडेंट आलिया गोगी यांनी दिली.

२६ स्टोअर्सचं अधिग्रहण
रिलायन्स ब्युटी अँड पर्सनल केअर लिमिटेड भारतातील १३ शहरांमध्ये असलेली २६ सेफोरा स्टोअर्स विकत घेणार आहे. अधिग्रहणासाठी लागणाऱ्या वेळेदरम्यान, स्टोअर आणि वेबसाइट नेहमीप्रमाणे काम करत राहतील. रिलायन्स ब्युटी अँड पर्सनल केअर लिमिटेडसाठी आरआरव्हीएलसाठी सौंदर्य व्यवसाय चालवते आणि ही भागीदारी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी वाढ करेल. भारतीय ब्युटी अँड पर्सनल केअर मार्केट १७ अब्ज डॉलर्सचा आहे. यात ११ टक्के सीएजीआरनुसार वाढ होतेय. सध्या हा व्यवसाय आपल्या सुरुवातीच्याच टप्प्यात आहे असं म्हटलं जातं.

Web Title: Ambani made a big Diwali purchase! World famous beauty business bought Sephora products will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.