Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगातील सर्वांत मोठी सिमेंट कंपनी आता अदानींकडे?

जगातील सर्वांत मोठी सिमेंट कंपनी आता अदानींकडे?

जगातील सर्वांत मोठी सिमेंट कंपनी असलेल्या होलसिम समूहाचा भारतातील व्यवसाय खरेदी करण्याची तयारी अदानी उद्योग समूहाने चालविली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 07:34 AM2022-04-16T07:34:42+5:302022-04-16T07:35:17+5:30

जगातील सर्वांत मोठी सिमेंट कंपनी असलेल्या होलसिम समूहाचा भारतातील व्यवसाय खरेदी करण्याची तयारी अदानी उद्योग समूहाने चालविली आहे. 

Ambuja and ACC Cements up for sale JSW Adani group show interest as Holcim may exit India | जगातील सर्वांत मोठी सिमेंट कंपनी आता अदानींकडे?

जगातील सर्वांत मोठी सिमेंट कंपनी आता अदानींकडे?

नवी दिल्ली :

जगातील सर्वांत मोठी सिमेंट कंपनी असलेल्या होलसिम समूहाचा भारतातील व्यवसाय खरेदी करण्याची तयारी अदानी उद्योग समूहाने चालविली आहे. 
होलसिम समूह भारतातील सिमेंट उद्योगात मागील १७ वर्षांपासून कार्यरत आहे.

होलसिम समूहाची भारतातील काही प्रमुख सिमेंट ब्रँडसमध्ये हिस्सेदारी आहे.  यात अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड आणि मायसेम यांचा समावेश आहे. यातील अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड या दोन्ही कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. अंबुजा सिमेंटमध्ये होलसिमची बहुतांश हिस्सेदारी आहे, हे विशेष.

अंबुजाच्या माध्यमातून एसीसीमध्येही कंपनीची बहुतांश हिस्सेदारी आहे. अंबुजा  सिमेंटमध्ये होलसिमची ‘होल्डरइंड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’च्या माध्यमातून ६३.१ टक्के हिस्सेदारी आहे. एसीसीमध्ये अंबुजा सिमेंटची ५०.०५ टक्के हिस्सेदारी आहे. 

अदानी ग्रीन ८ वी मोठी कंपनी
अदानी समूहात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल आणखी वाढले आहे. या कंपनीने बजाज फायनान्स आणि एचडीएफसी यांना मागे टाकले आहे. ही कंपनी सूचीबद्ध कंपन्यांत ८ व्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी बनली आहे.

Web Title: Ambuja and ACC Cements up for sale JSW Adani group show interest as Holcim may exit India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Adaniअदानी