Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'Johnson & Johnson' कंपनीच्या उत्पादनामुळे कॅन्सर होण्याचा धोका; सनस्क्रीनमध्ये आढळले 'बेंझिन'!

'Johnson & Johnson' कंपनीच्या उत्पादनामुळे कॅन्सर होण्याचा धोका; सनस्क्रीनमध्ये आढळले 'बेंझिन'!

Johnson & Johnson : आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी कोणतेही सनस्क्रीन बनवताना बेंझिनचा वापर केलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 11:26 AM2021-07-16T11:26:26+5:302021-07-16T11:27:13+5:30

Johnson & Johnson : आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी कोणतेही सनस्क्रीन बनवताना बेंझिनचा वापर केलेला नाही.

america cancer risk from us johnson and johnson sunscreens company recalled products | 'Johnson & Johnson' कंपनीच्या उत्पादनामुळे कॅन्सर होण्याचा धोका; सनस्क्रीनमध्ये आढळले 'बेंझिन'!

'Johnson & Johnson' कंपनीच्या उत्पादनामुळे कॅन्सर होण्याचा धोका; सनस्क्रीनमध्ये आढळले 'बेंझिन'!

वॉशिंग्टन : 'जॉन्सन अँड जॉन्सन' या अमेरिकन कंपनीच्या काही उत्पादनांमध्ये बेंझिन आढळले असून यामुळे कर्करोगाचा धोका आहे. त्यामुळे कंपनीने आपली सनस्क्रीन (Sunscreen) उत्पादने बाजारातून परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था एपीच्या म्हणण्यानुसार, सनस्क्रीन उत्पादनांची अंतर्गत तपासणी केली असता, उत्पादनांच्या नमुन्यांमध्ये कमी प्रमाणात बेंझिन आढळले आहे.  परत मागवलेल्या उत्पादनांमध्ये सर्व केन साइज, सन प्रोटेक्शन फॅक्टरचे सर्व लेव्हल किंवा एसपीएफचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी कोणतेही सनस्क्रीन बनवताना बेंझिनचा वापर केलेला नाही.

कंपनीने परत मागवलेली सनस्क्रीन उत्पादने...
या सनस्क्रीन उत्पादनांमध्ये अव्हिनो प्रोटेक्ट + रिफ्रेश एरोसोल सनस्क्रीन (Aveeno Protect + Refresh Aerosol Sunscreen) आणि चार न्यूट्रोजेना सनक्रीन व्हर्जन- बीच डिफेंस एरोसोल सनस्क्रीन ( Neutrogena Sunscreen Versions- Beach Defense Aerosol Sunscreen), कूलड्राय स्पोर्ट एरोसोल सनस्क्रीन (CoolDry Sport Aerosol Sunscreen), इनव्हिजिएबल डेली डिफेंस एरोसोल सनस्क्रीन  Invisible Daily Defense Aerosol Sunscreen) आणि अल्ट्राशीर एरोसोल सनस्क्रीन (UltraSheer Aerosol Sunscreen) यांचा समावेश आहे. 

वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार ही उत्पादने देशभरातील किरकोळ विक्रेत्यांना देण्यात आली होती. कंपनीचे म्हणणे आहे की, कंपनी आणि स्वतंत्र प्रयोगशाळांच्या तपासात बेंझिन आढळले आहेत. तसेच, ग्राहकांना त्वरित सनस्क्रीन वापरण्यास मनाई केली गेली आहे, परंतु ज्यांनी उत्पादन विकत घेतले आहे, त्यांना पैसे परत केले जातील. हे पैसे परत मिळविण्यासाठी या लोकांना ग्राहकांच्या सेवेवर कॉल करावा लागेल. दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, या प्रकरणाबाबत माहिती मिळताच आम्ही ताबडतोब आमच्या कच्च्या मालाचे उत्पादन आणि उत्पादन प्रक्रियेचा तपास सुरू केला आहे. यामध्ये आम्ही अंतर्गत चाचण्याही करत आहोत.

काय आहे बेंझिन आणि किती धोकादायक?
बेंझिन हे एक प्रकारचे ज्वलनशील आणि व्यापक प्रमाणात वापरले जाणारे रसायन आहे. यामुळे उच्च स्तरावर सतत संपर्कात आल्याने कर्करोग होऊ शकतो.

कंपनीच्या बेबी पावडरवरही आरोप झाला होता
दरम्यान, यापूर्वीही जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका असल्याचा आरोप झाला होता. ब्रूकलिनच्या एका महिलेने आणि तिच्या नवऱ्याने कंपनीवर बेबी पावडरमुळे कर्करोग होत असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर न्यूयॉर्क राज्यातील एका न्यायाधीशांनी कंपनीला 120 मिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई करण्याचे आदेश दिले.

Web Title: america cancer risk from us johnson and johnson sunscreens company recalled products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.