नवी दिल्ली : निर्यातीवर बंदी असतानाही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (एप्रिल-ऑक्टोबर) भारताची सुगंधी बासमती आणि गैरबासमती तांदूळ निर्यात ७.३७ टक्क्यांनी वाढून १२६.९७ लाख टन झाली आहे. गेल्या वर्षात याच कालावधीत ही निर्यात ११८.२५ लाख टन होती. निर्यातदार संघटनेचे माजी अध्यक्ष विजय सेतिया म्हणाले की, तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध असूनही, एकूण निर्यात आतापर्यंत भक्कम आहे. बासमती तांदूळ प्रामुख्याने अमेरिका, युरोप आणि सौदी अरेबियाच्या बाजारपेठेत पाठवला जातो, तर बिगर बासमती तांदूळ आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.
अमेरिका पडली बासमती तांदळाच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 10:37 AM