Join us

अदानी समुहाच्या शेअर्समध्ये GQG ची तिसऱ्यांदा मोठी गुंतवणूक; Adani एन्टरप्रायझेसचे शेअर्स वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 1:50 PM

GQG Partners Invests in Adani Stocks: एनआरआय गुंतवणूकदार राजीव जैन यांच्या नेतृत्वाखालील GQG पार्टनर्सनं अदानी समूहाच्या दोन शेअर्समध्ये ब्लॉक डीलद्वारे गुंतवणूक केली.

GQG Partners Invests in Adani Stocks: अमेरिकन कंपनी जीक्युजी पार्टनर्स (GQG Partners) आणि इतरांनी चार महिन्यांत अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये तिसरी मोठी गुंतवणूक केली आहे (GQG Partners Investment in Adani Stocks). जीक्यूजी पार्टनर्स आणि इतरांनी बुधवारी अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये १ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स खरेदी केले. या गुंतवणूकदारांनी ब्लॉक डीलद्वारे अदानीच्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. या व्यवहारानंतर अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये मोठी उसळी दिसून आली.

कामकाजादरम्यान अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसच्या १.८ कोटी समभागांची खरेदी-विक्री ब्लॉक डीलद्वारे झाली. त्याच वेळी, अदानी ग्रीन एनर्जीचे ३.५२ कोटी शेअर्सची खरेदी-विक्री झाली. कामकाजादरम्यान दुपारच्या सुमारास अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स २३९४ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. त्याच वेळी, अदानी ग्रीनचा शेअर ९३९.४५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. 

यापूर्वीही गुंतवणूकएनआरआय गुंतवणूकदार राजीव जैन यांच्या नेतृत्वाखालील जीक्युजीनं मार्चमध्ये अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर जीक्युजीनं अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स खरेदी केले होते.

टॅग्स :गौतम अदानीगुंतवणूकव्यवसाय