Lokmat Money > बिझनेस न्यूज > American Economy News: आठ महिन्यांत ४५२ कंपन्या झाल्या दिवाळखोर; अमेरिकेत नक्की चाललंय तरी काय?

American Economy News: आठ महिन्यांत ४५२ कंपन्या झाल्या दिवाळखोर; अमेरिकेत नक्की चाललंय तरी काय?

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेसाठी हे अतिशय वाईट ठरताना दिसत आहे. देशातील हजारो छोट्या-मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 12:04 PM2024-09-11T12:04:27+5:302024-09-11T12:04:48+5:30

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेसाठी हे अतिशय वाईट ठरताना दिसत आहे. देशातील हजारो छोट्या-मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत.

American Economy News 452 companies went bankrupt in eight months What exactly is going on in America details | American Economy News: आठ महिन्यांत ४५२ कंपन्या झाल्या दिवाळखोर; अमेरिकेत नक्की चाललंय तरी काय?

American Economy News: आठ महिन्यांत ४५२ कंपन्या झाल्या दिवाळखोर; अमेरिकेत नक्की चाललंय तरी काय?

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेसाठी हे अतिशय वाईट ठरताना दिसत आहे. देशातील हजारो छोट्या-मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत. वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत देशातील ४५२ बड्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्याची माहिती समोर आलीये. गेल्या १४ वर्षांतील हा इतक्या प्रमाणात कंपन्या दिवाळखोरीत गेल्याचा हा दुसरा सर्वाधिक आकडा आहे. २०२० मध्ये जेव्हा कोरोना महासाथीनं थैमान घातलं तेव्हा वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत म्हणजेच ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनमुळे ४६६ कंपन्या दिवाळखोर झाल्या होत्या. यावर्षी ऑगस्टमध्ये ६३ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या, तर जुलैमध्ये ४९ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या. ऑगस्ट हा गेल्या चार वर्षांतील अमेरिकी उद्योगासाठी चौथा सर्वात वाईट महिना होता.

सेक्टरनुसार सांगायचं झालं तर अमेरिकेत सर्वाधिक फटका हा कंझ्युमर डिस्क्रेशनरी सेक्टला बसला. यातील ६९ मोठ्या कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. यानंतर इंडस्ट्रियल सेक्टरचा क्रमांक येतो. यातील ५३ कंपन्या दिवाळखोर झाल्या, तर हेल्थकेअर विभागातील ४५ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या. कोरोना महासाथीनंतरही पहिलीच अशी वेळ आहे जेव्हा अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावल्याचं दिसत आहे. देशात मंदीच्या शक्यतेसोबतच विक्रमी संख्येत कंपन्या दिवाळखोरीत जाण्याचीही शक्यता आहे. देशात बेरोजगारीही वाढली आहे ग्राहक खर्चातही घसरण झालीये.

१५ वर्षात किती कंपन्या बंद झाल्या?

२०१० मध्ये अमेरिकेत ८२७ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या. तेव्हा अमेरिकेची अर्थव्यवस्था २००८ च्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपडत होती. २०११ मध्ये देशात ६३४ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या, तर २०१२ मध्ये ही संख्या ५८६ होती. २०१३ मध्ये ५५८, २०१४ मध्ये ४७१, २०१५ मध्ये ५२४, २०१६ मध्ये ५७६, २०१७ मध्ये ५२०, २०१८ मध्ये ५१८, २०१९ मध्ये ५८९, २०२० मध्ये ६३८, २०२१ मध्ये ४०६, २०२२ मध्ये ३७२ आणि २०२३ मध्ये ६३४ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या.

Web Title: American Economy News 452 companies went bankrupt in eight months What exactly is going on in America details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.